होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन

On: September 29, 2026 6:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात 28 सप्टेंबर 2026 रोजी विद्यार्थ्यासाठी शासनाचे विविध शिष्यवृत्ती, अर्ज व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते मु.जे.महाविद्यालयाचे अधिष्ठाता संतोष मनुरे व मु.जे.महाविद्यालयाचे कनिष्ठ लिपिक कुलदीप भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. दरम्यान, संतोष मनुरे यांनी 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क माफी योजनेबद्दल माहीती दिली. तसेच MAHA DBT Portal वर कसा अर्ज भरावा तसेच त्यासाठीचे लागणारे कागदपत्र यांविषयी माहिती दिली.

तर कुलदीप भालेराव यांनी SC/ST/NT/OBC /EWS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शिष्यवृत्ती बद्दल माहीती दिली. त्यात त्यांनी post metric, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, स्वाधार योजना आदी शिष्यवृत्ती बद्दल महिती दिली.तसेच विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा अर्ज करताना येणाऱ्या समस्या व विविध शंकेचे निवारण केले.

तसेच विद्यार्थ्यांना आवाहन केले की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा जेणेकरुन त्यांना आर्थिक सहायता मिळून त्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, विज्ञान शाखा समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी व कला वाणिज्य शाखेचे समन्वयक उमेश पाटील यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण समितीच्या अध्यक्ष प्रा. कविता सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुरेखा पाटोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संदिप गव्हाळे , प्रा. विनोद पावरा, प्रा. सुरेखा पाटोळे, प्रा. कविता भारूळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment