होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Asian Games 2026: भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्यात भिडणार; ३ ऑक्टोबरला क्रिकेटचा महामुकाबला रंगणार!

On: October 2, 2026 3:50 PM
Follow Us:
---Advertisement---

Asian Games 2026: दोन प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना जगभरातील क्रिकेट प्रेमीं आवर्जून बघत असतात. क्रिकेट चाहत्यांना आशियाई खेळाच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एक संधी आली आहे. आशियाई खेळ २०२६ मधील पुरुष क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहे. तत्पूर्वी उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेला १२४ धावांनी पराभूत केले, तर पावसामुळे बाधित झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला सहा गडी राखून हरवले. एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये पाकिस्तानची कामगिरी दोघांमध्ये सरस आहे, तर भारताने दोन्ही टी-२० आंतरराष्ट्रीय अंतिम सामने जिंकले आहेत. त्यामुळे या दोनही पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे संपूर्ण क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे.

दरम्यान आशियाई खेळ २०२६ मधील सर्वात मोठा क्रिकेट सामना निश्चित झाला आहे. ३ ऑक्टोबर रोजी पुरुष क्रिकेटच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहे. सामना सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी सकाळी ९:३० वाजता होईल. गुरुवारी आपापल्या उपांत्य सामन्यांमध्ये प्रभावी विजय मिळवून दोन्ही संघांनी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. पावसामुळे बाधित झालेल्या १३ षटकांच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला १२४ धावांनी, तर पाकिस्तानने बांगलादेशला सहा गडी राखून पराभूत केले.

भारताने श्रीलंकेला नमवले

भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६९ धावा केल्या. ईशान किशनने कठीण खेळपट्टीवर धुव्वाधार ८० धावांची शानदार नाबाद खेळी करून संघाला एका भक्कम भक्कम धावसंख्येपर्यंत नेले. वैभव सूर्यवंशीनेही ३८ धावा करून महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीची पूर्णपणे वाताहत केली. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले आणि श्रीलंकेचा संघ अवघ्या ४५ धावांत गारद झाला. भारताने हा सामना १२४ धावांनी जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. श्रीलंकेचा ४५ धावांत सर्वबाद होणे ही पूर्ण सदस्य संघांमधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील संयुक्तपणे सर्वात कमी धावसंख्या आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने मिळवलेला हा भारताचा ११ वा विजय आहे.

पाकिस्तानने बांगलादेशला हरवले

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे प्रत्येकी १३ षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला १११/७ धावांवर रोखले. तौहीद हृदोयने २५ चेंडूंमध्ये ४२ धावा करून बांगलादेशच्या डावाला आधार दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना, पाकिस्तानने ११.३ षटकांत चार गडी गमावून ११२ धावा केल्या. अब्दुल समदने नाबाद ३० आणि हसन नवाझने नाबाद २७ धावा केल्या. पाकिस्तानने हा सामना सहा गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान

सांख्यिकी नोंद
एकूण अंतिम सामने: ११
भारताचे विजय: ३
पाकिस्तानचे विजय: ८

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

बुद्धिबळ स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाचे खेळाडू चमकले; विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रसाद सोनवणे याची ४० व्या ज्यु. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या चार खेळाडूंची निवड; विवेकानंद महाविद्यालयातील या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव

माहेश्वरी चोपडेची पंजाबमधील बॉक्सिंग चाचणीसाठी निवड

छत्रपती चषक अंतिम सामना: अटीतटीच्या लढतीत धानोरा संघाने पटकावला ‘छत्रपती चषक’; चोपडा छत्रपती शिवाजी महाराज संघ ठरला उपविजेता

इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस कर्णधार; आणखी कोणाची निवड झाली “ते” जाणून घ्या

Leave a Comment