होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Latest Weather Update: नंदुरबार- जळगावचा पारा चढला! ‘या’ ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट, उर्वरित महाराष्ट्र कोरडाठाक

On: October 2, 2026 7:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, आणि अहिल्यानगर या ५ जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार असून याठिकाणी उन्हाचा दाह वाढण्याची शक्यता आहे. त्यातच नंदुरबार येथे कमाल तापमान ३७.४ तर जळगाव ३७.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. त्यामुळे हवामानातील उष्मा या ठिकाणी पुढील काळात १ ते २ अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे. राज्यात सर्वात उष्ण जिल्हा म्हणून अमरावती नोंदवले गेले आहे. त्याचे तापमान ३७.६ अंश इतके आहे. आज आणि उद्या २ व ३ ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे व दमट राहणार आहे.

 ‘हे’ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्र कोरडा

उद्या ३ ऑक्टोबर रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुख्यतः निरभ्र हवामान राहण्याची दाट शक्यता आहे तर, ४ ऑक्टोबरला दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान राहील. तसेच उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रामुख्याने उष्ण हवामान असेल असा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे सहा जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात कोरडे आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

दरम्यान महाराष्ट्रात बहुसंख्य जिल्ह्यात दुष्कळ सदृश्य परिस्थिती आहे. काही ठिकाणी पिके जळाली तर काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही पीक हातचे गेले आहे. कोकणात मात्र पावसाची शक्यता आहे. ४ ऑक्टोबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरीला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर ५ ऑक्टोबरला रायगड व रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment