होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Legislative Council Elections:तिढा सुटला; भाजपाकडून शिक्षक अन् पुणे-नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

On: October 4, 2026 5:33 PM
Follow Us:
---Advertisement---

MLC Election: महायुतीला जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आली आहे. त्यानंतर पक्षांतर्गत उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीन मतदारसंघांसाठी प्रत्येकी पाच संभाव्य उमेदवारांची नावे अशी एकूण १५ नावांची यादी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविली होती. केंद्रीय पातळीवर उमेदवाराचे नावे निश्चित झाली आहे. तसेच पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे, पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभागातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना पक्षाने तिकीट जाहीर केले आहे.

विधान परिषदेच्या पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी आणि ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत उमेदवार निश्चितीबरोबरच संभाव्य बंडखोरांची भूमिकाही स्पष्ट होणार आहे.

दरम्यान आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे, पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न जोर लावला होता. त्यामुळे जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर चिवटे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ओसडी सचिन सानप देखील या मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते.भाजपाला जागा मिळाल्याने, त्यांच्या ही पदरी निराशा आली आहे.

महायुतीच्या संभाव्य जागावाटपानुसार पुणे शिक्षक, पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर या तीन जागा भाजप, तर, अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे समोर आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment