होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नटसम्राट नाना पाटेकर यांची ‘एक्झिट’ चटका लावणारी; ‘असा नट होणे नाही’

On: October 9, 2026 12:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: सिनेसृष्टीतलं दिग्गज अभिनेते व आपल्या अष्टपैलु आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जाणारे पाटेकर (७६) यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची शोकभावना व्यक्त करून देशाच्या राष्ट्रपतींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. डोणजे येथे शासकीय इतमामात नाना पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नानांची इच्छा होती की त्यांचा अखेरचा निरोप त्यांच्याच गावातून दिला जावा. नाना पाटेकर यांचे पार्थिव आज संध्याकाळी पुण्याजवळील डोंजे गावातील त्यांच्या घरी आणण्यात आले.

चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालंय. परंतु मृत्यूपूर्वी नाना पाटेकरांना छातीत तीव्र वेदना होऊ लागलेल्या तशी तक्रार त्यांनी गोव्यातल्या आपल्या एका मित्राला मेसेज पाठवून सांगितली. त्याच्या त्या डॉक्टर मित्राने माध्यमांना माहिती देतांना सांगितले. मनिपाल हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी माध्यमांना माहिती दिली की, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना पहाटे ४.२० च्या सुमारास रुग्णालयात आणलं असता त्यापूर्वीच त्याचा प्राण ज्योत मालवली होती. तरी, डॉक्टरांनी सीपीआर (CPR) द्वारे त्यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले, पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या जाण्यानं हिंदी सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी सांगितले की, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे “ज्येष्ठ अभिनेते श्री नाना पाटेकर यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिनयातून त्यांनी मानवी जीवनातील विविध पैलू जिवंत केले. त्यांनी साकारलेली पात्रे लोकांच्या हृदयावर आणि मनावर कायमची छाप सोडून गेली,” असे राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकरजी यांच्यासारखे भावभावनांचे तीक्ष्ण प्रकटीकरण, व्यक्तिमत्त्व आणि भूमिकेवर उठणारी अमिट छाप फार कमी कलाकारांमध्ये आढळते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांनी प्रत्येक भूमिकेत आपले असामान्य अष्टपैलूत्व दर्शवित आणि सर्जनशीलता आणत प्रेक्षकांच्या पिढ्यानपिढ्या स्मरणात राहतील अशी पात्र साकार केली, असे नमूद करून मोदी पुढे म्हणाले की, त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक मतांसाठीही ते तितकेच प्रशंसनीय होते; आपला विश्वास असलेल्या गोष्टी व्यक्त करताना ते कधीही कचरले नाहीत.

भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्याआड गेला आहे. नटसम्राट नानांची अशी आकस्मिक एक्झिट धक्कादायक आहे, अशी शोकमग्न भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी घेतलेली भूमिका कलाक्षेत्रासह, अनेकांना सामाजिक बांधिलकीचा धडा घालून देणारी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टी, महाराष्ट्र आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. गेल्याच आठवड्यात अनंत चतुर्दशी दिवशी नानांच्या पुण्याच्या घरी गणपती दर्शनाच्या वेळेस झालेली भेट ही शेवटची ठरली, अशी शोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करताना नानांच्या आठवणींना उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, नाना पाटेकर हे अभिनयाची एक जिवंत शाळा होते. ‘नटसम्राट’ चित्रपटातील त्यांचे संवाद आजही प्रेक्षकांच्या कानात घुमतात. चित्रपटाच्या पडद्यावर ते जितके भारदस्त असायचे, तितकेच खऱ्या आयुष्यात ते अत्यंत साधे आणि जमिनीवर असणारे व्यक्ती होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

सावधान! सायबर गुन्हेगार करताहेत वृद्धांना टार्गेट; एका निवृत्त शास्त्रज्ञाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून १.२५ कोटींची फसवणूक; अखेर ११ जण गजाआड

केंद्रीय कर्मचारी अन् निवृत्तीधारकांच्या ‘डीए- डीआर’मध्ये लवकरच होणार वाढ; ‘एआयडीइएफ’ने सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Leave a Comment