होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी आता मोबाईलवर गृहपाठ देणे बंद होणार: मंत्री दादा भुसे

On: October 9, 2026 4:36 PM
Follow Us:
---Advertisement---

Raigad News: विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी ‘मिशन आरंभ’द्वारे पायाभूत साक्षरता, गणिती कौशल्ये आणि सामूहिक पाढे पाठांतरावर भर दिला जाणार आहे. तसेच मोबाईल स्क्रीन टाईम नियंत्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईलवर गृहपाठ देणे पूर्णपणे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी

अलिबाग येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘चला शाळेत जाऊ या’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळांमधील मूलभूत सुविधांचा कायापालट करण्यावर भर देण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री भरतशेठ गोगावले उपस्थित होते. तसेच आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार पंडीतशेठ पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, महिला बाल कल्याण सभापती रसिका केणी, जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.

आपल्या मार्गदर्शनात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शाळांच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणप्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी राज्यात ‘चला शाळेत जाऊ या’ अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमधील कमी होत चाललेली शारीरिक हालचाल विचारात घेऊन दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायतींचा ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात एकाच वेळी दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जागतिक विक्रम रचल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

प्रशासकीय चौकटीच्या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधी, अधिकारी, पालक व माजी विद्यार्थ्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घ्याव्यात, असे आवाहन याप्रसंगी श्री.भुसे यांनी केले. शाळांच्या किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी निधी थेट मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) संयुक्त खात्यावर वर्ग होणार असल्याने कामांमध्ये पारदर्शकता आणि वेग येईल, असे सांगून ते म्हणाले की, जिल्हा नियोजन विकास निधी (DPDC) द्वारे प्रत्येक सरकारी शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि संरक्षक भिंती या सुविधा प्राधान्याने दिल्या जातील. याशिवाय, शाळांमधील वापरात नसलेल्या खोल्यांचे रूपांतर सीएसआर (CSR) निधीच्या माध्यमातून हायटेक ग्रंथालये व तंत्रज्ञानयुक्त ‘एआय’ अध्ययन केंद्रांमध्ये केले जाणार आहे.

ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रत्येक बालकाची सखोल तपासणी करून ‘हेल्थ कार्ड’ दिले जाईल. मुलींसाठी शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, विश्रांतीसाठी ‘फुलराणी कक्ष’ आणि ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी कर्करोग प्रतिबंधात्मक (HPV) लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. ‘मिशन अभय’अंतर्गत बालसुरक्षा, गुड टच-बॅड टच आणि सायबर सुरक्षेचे धडे दिले जातील.

क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’ची स्थापना केली जाणार असून, प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर १००’ उपक्रम आणि इस्रो-नासासारख्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संस्थांच्या अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment