होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Maharashtra Drought: राज्यासमोर दुष्काळ अन् पिकांचे नुकसान ही सर्वात मोठी आव्हाने: फडणवीस

On: October 9, 2026 6:29 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे.अशातच राज्यासमोर मोठे संकट आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एल निनो’मुळे (El Niño) निर्माण झालेला दुष्काळ, पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि पिण्याचे पाणी व चारा टंचाईची शक्यता ही राज्यासमोरील सर्वात मोठी आव्हाने आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात सांगितले.

ते ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलत होते. या प्रसंगी फडणवीस म्हणाले की, राज्यातील सुमारे ७५ टक्के पिकांवर परिणाम होऊन मोठे नुकसान झाले आहे आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. असे एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

“आव्हाने तर नेहमीच असतात. आपली अर्थव्यवस्था विकसनशील आहे आणि विकसनशील अर्थव्यवस्थेत कोणते ना कोणते आव्हान नेहमीच असते. परंतु, जर तुम्ही मला तात्काळ आव्हानाबद्दल विचारले, तर मला वाटते की या वर्षी ‘एल निनो’मुळे निर्माण झालेला दुष्काळ हेच सर्वात मोठे आव्हान आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर केंद्राचे एक पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. ९ आणि १० ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या औरंगाबाद विभागाच्या दौऱ्यावर आहे. याठिकाणी पथकाने विभागीय आयुक्तांकडून दुष्काळासंदर्भात माहिती घेतली, तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागात दौरा करून पिकांची पाहणी ही केली. हे पथक उद्याही दुष्काळी भागात पाहणी करणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment