होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

YDCC Bank Election: यवतमाळ जिल्हा बँकेवर महायुतीचे वर्चस्व; शिवसेना ठरला मोठा पक्ष

On: October 13, 2026 2:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Yavatmal News: ग्रामीण भागाच्या विकासाचा आर्थिक कणा आणि शेतकऱ्यांची बँक असलेली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (YDCC Election) महायुतीने मागील दोन दशकांहून अधिक काळ असलेली काँग्रेसची सत्ता उलटवून बँकेवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदें गट) मोठा वाटा असून त्यांचे मोठ्या प्रमाणात संचालक निवडून आले असून शिवसेनेनं मोठा विजय संपादन केला आहे.

याठिकाणी महायुतीची स्थिती भक्कम झाली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्व उजवं ठरलं आहे. या निवडणुकीत बळीराजा सहकार पॅनलचे एकूण १६ जागांवर संचालक निवडून आले आहे. तर, महाविकास आघाडीचे शेतकरी सहकार पॅनलचे ९ संचालक निवडून आले. बँकेवरील काँग्रेसची सत्ता उलटून लावत महायुतीने एकहाती सत्ता काबीज केली.

महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत शिवसेना (शिंदें गट) निर्णयक ठरली. शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आपलाच झेंडा फडकावा, यासाठी युती व आघाडीने जागा वाटपापासून ते प्रचारापर्यंत रणनिती आखली होती. काही गटात अपक्षांनीही उडी घेतली होती. तर २५ संचालक असलेल्या या बँकेत २ खासदार संजय देशमुख आणि विजय जाधव बिनविरोध आल्याने २३ संचालक पदासाठी तब्बल ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

यासाठी जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रावर १२७२ मतदार मतदानाची प्रक्रिया पार पडली. महायुतीचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख आणि महाविकास आघाडीत आमदार बाळासाहेब मांगुलकर, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके माजीराज्य मंत्री माणिकराव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर यात महायुतीने मागील २५ वर्षाची काँग्रेसच्या सत्ता उलटवित बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयात प्रथमच सर्वाधीक संचालक शिंदेंसेनेचे निवडून आले असून शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

विधान परिषदेच्या शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीसाठी भाजप- महायुतीची प्रतिष्ठापणाला

MLC Election: विधान परिषद निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात मतभेद

Legislative Council Elections:तिढा सुटला; भाजपाकडून शिक्षक अन् पुणे-नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

दोन दिग्ग्ज नेत्यांसह ११ नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या गळाला; राजकीय समीकरणे बदलणार

CJP म्हणजेच काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

मतदार याद्यात चोरी करण्याचा भाजपचा डाव: हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप नाशिकला काँग्रेसच्या १० दिवसीय शिबिरास सुरुवात..समारोपाला राहुल गांधी यांची उपस्थिती

Leave a Comment