Central Railway: मध्य रेल्वे द्वारा आगामी पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हडपसर ते मुजफ्फरपुर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या कँन्ट दरम्यान अमृत भारत विशेष गाड्यांचे संचालन करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय तसेच अतिरिक्त प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. जळगाव आणि भुसावळच्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी आहे.
भुसावळ विभागातून धावणारी विशेष गाडी
हडपसर ते मुजफ्फरपुर साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी १२ फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही ०१४८१ साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक २० ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रत्येक मंगळवारी हडपसर येथून १९:५५ वाजता सुटेल आणि गुरुवार रोजी १२:०० वाजता मुजफ्फरपुर येथे पोहचेल. तर,
०१४८२ साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक २२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक गुरुवार रोजी मुजफ्फरपुर येथून १३:१५ वाजता सुटेल आणि शनिवार रोजी ०२:४५ वाजता हडपसर येथे पोहचेल.
गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन द्याल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, आणि हाजीपूर.
कोच संरचना अशी आहे, ११ सामान्य श्रेणी कोच, 8 स्लीपर श्रेणी कोच, 1 पॅन्ट्री कार आणि 2 दिव्यांगजन/सामान व गार्डसह कोच.
हडपसर ते मुजफ्फरपुर साप्ताहिक अमृत भारत गाड़ी
०१४५३ साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक १९ ते २३ या यादरम्यान प्रत्येक सोमवारी हडपसर येथून १९:५५ वाजता सुटेल आणि बुधवार रोजी १२:०० वाजता मुजफ्फरपुर येथे पोहचेल. तसेच ०१४५४ ही साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक २१ ते २५ या कालावधीत प्रत्येक बुधवारी मुजफ्फरपूर येथून १३:१५ वाजता सुटेल आणि शुक्रवार रोजी ०२:४५ वाजता हडपसर येथे पोहचेल.
गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन द्याल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, आणि हाजीपूर अशे थांबे असतील. कोचची संरचना अशी आहे, ११ सामान्य श्रेणी कोच, ८ स्लीपर श्रेणी कोच, १ पॅन्ट्री कार आणि २ दिव्यांगजन-सामान व गार्डसह कोच असतील
एलटीटी टर्मिनस ते अयोध्या कॅन्ट द्वि-साप्ताहिक अमृत भारत
०१०४५ द्वि-साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०७:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०:१५ वाजता अयोध्या कैंट येथे पोहचेल. तसेच ०१०४६ द्वि-साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक २० ते २८ या कालावधीत प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी अयोध्या कैंट येथून १३:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७:१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल.

गाडीला कल्याण, इगतपूरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ़ आणि सुलतानपूर थांबे असतील. कोचची संरचना अशी आहे, ११ सामान्य श्रेणी कोच, ८ स्लीपर श्रेणी कोच, १ पॅन्ट्री कार आणि २ दिव्यांगजन-सामान व गार्डसह कोच.
विशेष गाडी क्रमांक ०१४८१, ०१४५३ आणि ०१०४५ साठी आरक्षण १८ ऑक्टोबरपासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावर सुरू होईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा देखील वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळेसाठी एनटीइएस (NTES) भारतीय रेल्वे चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे.









