होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

Jalgaon Election Latest : बोगस मतदान केल्याचा आरोप, जळगावात एकाला चोप

On: January 15, 2026 7:12 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Election Latest : जळगाव शहरातील एका मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याच्या आरोपावरून एका तरुणाला चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असून, संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

शहरातील एका मतदान केंद्रावर हा तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे काहींच्या लक्षात आले. यावरून बाचाबाची होऊन संतप्त नागरिकांनी त्याला मतदान केंद्राच्या परिसरात चोप दिला.

यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता, हा तरुण चाळीसगावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

अधिक तपास सुरु

तो या ठिकाणी मतदानासाठी आला होता का ? त्याच्याकडे असणारी कागदपत्रे अधिकृत आहेत का? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पुण्यात एकाला चोप

दुसरीकडे पुण्यातदेखील एका मतदान केंद्रात बोटावर लावल्या जाणाऱ्या शाई ऐवजी केमिकल लावलं जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एकाला चोप देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment