होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Accident News: कंडारी फाट्याजवळ भीषण अपघात, कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

On: January 18, 2026 12:05 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Accident News: जळगाव- औरंगाबाद महामार्गावरील कंडारी फाटा (उमाळा) येथे शनिवारी दुपारी दुचाकी, बस आणि कंटेनरचा विचित्र अपघात झाला. भरधाव बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात कंटेनरने चिरडल्याने 60 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे.

याबाबात माहिती अशी की, प्रल्हाद अमृत बाविस्कर (वय 60, रा. मण्यारखेडा, ता. भुसावळ) हे पत्नी सुनिताबाई प्रल्हाद बाविस्कर (वय 52) यांच्यासह त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 19 ईडी 9339 ने उमाळा फाट्याकडून मण्यारखेड्याकडे जात होते. दरम्यान, शनिवारी दुपारी 4:40 वाजेच्या सुमारास, प्रल्हाद बाविस्कर यांच्या दुचाकीला पाठीमागून येणार्‍या बस क्रमांक: एम एच 19 7401 ने मागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील प्रल्हाद बाविस्कर हे दुचाकीवरुन फेकले जात जळगावकडून येणार्‍या एका कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली आले.


दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


हा अपघात इतका भीषण होता की, बसने धडक दिल्याने दुचाकीवरील प्रल्हाद बाविस्कर हे फेकले जात जळगावकडून येणार्‍या एका कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली आले. कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रल्हाद बाविस्कर यांच्या पत्नी सुनिताबाई या देखील रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात त्यांच्या दुचाकीचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ बाबुराव नामदेव बाविस्कर (वय 67) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे फिर्याद दिल्याने बस चालक सचिन भारत बागुल (वय 41, रा. रावेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment