होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नंदुरबार जिल्ह्यात आढळले भारतीय प्रजातीचे ‘गिधाड’

On: January 19, 2026 11:38 AM
Follow Us:
---Advertisement---

नंदुरबार : शहाद्याच्या होळगुजरी शिवारात आढळलेल्या ‘भारतीय’ प्रजातीच्या गिधाड पक्षाला उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, हे गिधाड मेळघाटातून सातपुड्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री आणि सोसायटी वनविभागाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात १५ लांब चोचीच्या गिधाडांचे नुकतेच यशस्वी टॅगिंग केले आहे; या गिधाडांना मुक्त सोडण्यात आले होते. त्यांची हालचाल, त्यांनी केलेल्या प्रवासाचे अंतर, सुरक्षितता आणि त्यांचा जंगलातील टिकाव यांचा अभ्यास करण्यात येत होता.

यातीलच एक गिधाड अन्नाअभावी आजारी पडलेले शहादा तालुक्यात आढळले. मेळघाटातून उडत सातपुड्याच्या दिशेने आलेल्या गिधाडाला गेल्या अनेक दिवसांपासून अन्न नसल्याने त्याच्यात अशक्तपणा आला होता. यात पंखात इजा झाल्यानंतर हे गिधाड शहादा तालुक्यात आले होते.

संशोधनासाठी सोडण्यात आलेल्या १५ गिधाडांचे प्रजनन


मेळघाटातून संशोधनासाठी सोडण्यात आलेल्या १५ गिधाडांचे प्रजनन हरयाणातील पिंजोर येथील केंद्रातून करण्यात आले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे हे देशातील पहिले प्रजनन केंद्र आहे.

प्रजननानंतर या गिधाडांना सुरक्षितपणे मेळघाटात आणले गेले. मेळघाटात पाठविलेल्या १९ गिधाडांना जीएसएम, तर चार गिधाडांना जीपीएस टॅग बसविण्यात आले आहेत. हे टॅग हर्नेसिंग या सुरक्षित पद्धतीने पाठीवर लावलेले आहे.

सर्व गिधाडांच्या पायांमध्ये हिरव्या रंगाची रिंगही बसविली आहे. त्यावर विशिष्ट ओळख क्रमांक आहे. निळा रंग भारतात रिंगिग केल्याचे दर्शवितो, तर एम हे अक्षर महाराष्ट्रातील मुक्तिस्थळ सूचित करते. नाशिक येथील उपचारानंतरच या गिधाडाच्या पुढील प्रवासाबाबत माहिती देण्यात येणार आहे.

मेळघाटाकडे रवाना केले जाणार – वनसरंक्षक संजय साळुंखे

पशुवैद्यकांनी शहादा येथे उपचार केल्यानंतर गिधाडाला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील वनविभागाच्या विशेष पशुचिकित्सालयात पाठविण्यात आले आहे. याठिकाणी गिधाडाला योग्य ते उपचार आणि अन्न दिल्यानंतर पुन्हा मेळघाटाकडे रवाना केले जाणार असल्याची माहिती सहायक वनसरंक्षक संजय साळुंखे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment