होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Sharad Pawar : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का, काय घडलं?

On: January 19, 2026 1:33 PM
Follow Us:
---Advertisement---

Sharad Pawar : महापालिका निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागलेल्या शरद पवार गटाने आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याच्या तयारीत आहे. अशात पक्षाच्या महाराष्ट्र शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शरद पवार यांना आणखी फटका बसला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात पक्षाने सातत्याने आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध भूमिका घेतल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

किरण सोनटक्के हे परभणीतील जांब जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. सोनटक्के हे २१ वर्षांपासून संघटनेशी जोडलेले होते, या काळात त्यांनी अनेक पदांवर काम केल्याचे बोलले जात आहे.

मात्र सोनटक्के यांनी ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शरद पवारांच्या पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment