होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Zilla Parishad News : आणखी काही कर्मचारी रडारवर; काय आहे प्रकरण?

On: January 20, 2026 4:36 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Zilla Parishad News : राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी मोहिमेत जिल्हा परिषदेत मोठे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. प्रमाणपत्रातील दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आणखी चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, अजून अनेक कर्मचारी जिल्हा परिषदेच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे.

जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे आरोग्य सहायक भालचंद्र नारायण पवार, वाघोड येथील आरोग्य सहायिका छाया घनश्याम भोळे, तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक संदीप विनायक सोनवणे, पिंपरखेड आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक गणेश मुरलीधर महाजन यांना निलंबित केले आहे.

आतापर्यंत ८ जणांवर कारवाई


यापूर्वी देखील तपासणी मोहिमेत दोषी आढळलेल्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता नव्याने ४ जणांची भर पडल्याने, जिल्हा परिषदेने आतापर्यंत एकूण ८ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, अजून अनेक कर्मचारी जिल्हा परिषदेच्या रडारवर आहेत.

दिव्यांग कर्मचारी तपासणी मोहिमेत पारदर्शकता पाळली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या टक्केवारीत तफावत आढळली आहे, त्यांच्यावर नियमानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी ज्यांनी बोगस प्रमाणपत्र सादर केली आहेत. त्या सर्वांवर कारवाई होईल, अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment