IND vs NZ 1st T20 : भारतविरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका आज, २१ जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु हा सामना मोबाईलवर मोफत कसा पाहायचा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मोबाईलवर मोफत सामना कसा पाहाल?
टीव्ही प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामना थेट पाहू शकतील. सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. मोफत सामना जिओहॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तर काही जिओ मोबाइल रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, ३४९ आणि ३९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शनदेखील समाविष्ट आहे.
भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (यष्टीरक्षक) आणि रवी बिश्नोई.
न्यूझीलंडचा संघ
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेवन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, इश सोधी आणि ख्रिश्चन क्लार्क.










