होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Health Tips : दारूसोबत ‘हे’ पदार्थ खाताय? मग सावध व्हा, अन्यथा…

On: February 1, 2026 6:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Health Tips : अल्कोहोल घेताना अनेकांचे ”चकली, चिप्स, पिझ्झा वा गोड पदार्थ” हे आवडते पर्याय असतात. मात्र, दारूसोबत काय खावे यापेक्षा काय खाऊ नये हे जाणून घेणे अधिक महत्वाचे आहे. कारण चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास पचनसंस्था बिघडू शकते, नशा लवकर चढू शकते आणि दीर्घकाळात आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर हे पदार्थ नेमके कोणते आहेत? जाणून घेऊया.

चॉकलेट अन् मिठाई

तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलसोबत काही पदार्थ एकत्र केल्यास शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. सर्वसाधारणपणे चॉकलेट आणि मिठाई दारूसोबत टाळायला पाहिजे.

काही लोक नशा वाढवण्यासाठी चॉकलेट खातात, पण हे चुकीचे आहे. चॉकलेटमध्ये कॅफिन आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने गॅस्ट्रो-इन्टेस्टाइनल समस्या, ऍसिडिटी आणि नशा जलद वाढण्याचा धोका असतो. 

शेंगदाणे अन्

शेंगदाणे, हरभरा, राजमा, मसूर आणि इतर बीन्सदेखील दारूसोबत टाळावेत. विशेषतः रेड वाईनसोबत हे पदार्थ खाल्ल्यास पोटदुखी, गॅस आणि अपचन होऊ शकते. रेड वाईनमधील टॅनिन आणि डाळींमधील लोह एकत्र आल्याने पोषणतत्त्वांचे शोषण कमी होते.

पिझ्झा बर्गर…

पिझ्झा, बर्गर आणि इतर पिठाचे पदार्थ दारूसोबत खाणेही घटक ठरू शकते. हे पदार्थ पचायला जड असून, अल्कोहोलसोबत घेतल्यास ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ आणि पोट फुगण्याच्या तक्रारी वाढतात. पिझ्झामधील टोमॅटो आणि चीज यामुळे ऍसिडिटी आधी वाढ शकते.

तसेच बाहेरचे ब्रेड, सँडवीच, फ्राय पदार्थ आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स टाळावेत. ब्रेडमधील यीस्ट पचनासाठी कठीण ठरते आणि अल्कोहोलसोबत घेतल्यास यकृतावर ताण येऊ शकतो. खारट व मसालेदार पॅकेज्ड पदार्थांमुळे शरीर अधिक डिहायड्रेट होते, ज्यामुळे थकवा, डोकेदुखी आणि पचनाचे विकार उद्धवू शकतात.

( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment