होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Israel Iran US War : इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका, पुण्यातील विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले

On: March 1, 2026 12:20 PM
Follow Us:
---Advertisement---

Israel Iran US War : इस्त्रायल-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुवन अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अशात पुण्यातील नामांकित विद्यालयाचे 84 जणं दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या 84 जणांमध्ये 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश आहे.

 

पुण्यातील नामांकित विद्यालयाचे हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थी “स्टडी व्हिसिट” साठी दुबई येथे गेले होते. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

महाविद्यालयाचे डीन जनार्दन पवार, यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, सगळे विद्यार्थी सुखरूप आणि सुरक्षित आहेत. 42 मुलं आणि 42 मुली असा 84 जणांचा विद्यार्थ्यांचा समूह दुबई येथे गेला होता. आम्ही या विद्यार्थ्यांच्या पालकांशी आणि दुबईमध्ये असलेल्या सगळ्या शिक्षकांशी सुद्धा संपर्कात आहोत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून न जाण्याचा आवाहन आहे.

 

हे विद्यार्थी ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी गेले होते, सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत. त्या ठिकाणी असलेली विद्यार्थी आणि आमच्या कॉलेजचा स्टाफ तिथे आहे त्यांच्या सोबत आमचा संपर्क झाला आहे, विद्यार्थीच्या पालक पण आमच्या संपर्कात आहे. दुबईमधील भारतीय दूतावास कार्यालयासोबतही आमच बोलणं झाला आहे, घाबरून न जाण्याचे आवाहन पालकांना करत आहोत, असंही डीन जनार्दन पवार, यांनी सांगितलं.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment