होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास प्रारंभ; अदिती तटकरे यांची माहिती

On: March 27, 2026 4:45 PM
Follow Us:
---Advertisement---

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिल्या हप्त्याची आतुरतेने वाट बघाणाऱ्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून पहिला हप्ता वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील महिलांसाठी आजचा दिवस आनंदाचा असून फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपयांचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया आजपासून प्रशासन पातळीवर सुरू झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल माध्यमातून ही अधिकृत माहिती दिली आहे.

पुढील काही तासात हा सन्माननिधी वितरणास प्रारंभ होईल.साधारण ४८ ते ७२ तासांत रक्कम जमा होणार अशी माहिती
मंत्री अदिती तटकरे यांनी दिली, त्यांनी याबाबत स्पष्ट केले की, फेब्रुवारी महिन्याचे अर्थसहाय्य लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत म्हणजे ४८ ते ७२ तासांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली दिसेल. ज्या महिलांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांना प्राधान्याने हा लाभ दिला जात आहे.

ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी आहे, या योजनेचा लाभ मिळवण्यात तांत्रिक अडचणी येत असलेल्या महिलांसाठी ३१ मार्च ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना किंवा माहिती भरताना अनेक महिलांकडून काही चुका झाल्या होत्या, ज्यामुळे त्यांचा निधी अडकला होता. अशा महिलांना ही चूक सुधारण्यासाठी सरकारने ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. आता केवळ ६ दिवस शिल्लक असून, महिलांनी आपल्या मोबाईलवरून किंवा महा-ई-सेवा केंद्रावरून ही दुरुस्ती करून घेणे अनिवार्य आहे. असे त्या म्हणाल्या. मार्च हा अडचणींचा महिना आहे. याचा बहिणांना फायदा होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment