Central Railway: उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेताला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भर उन्हाळ्यात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया साप्ताहिक विशेष (18 सेवा)
ट्रेन क्रमांक 08610 साप्ताहिक विशेष गाडी, 22 एप्रिल 2026 ते 17 जून 2026 या कालावधीत, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दर बुधवारी 05.00 वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी 18.00 वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण 9 फेऱ्या होतील.
ट्रेन क्रमांक 08609 साप्ताहिक विशेष गाडी, 20 एप्रिल 2026 ते 15 जून 2026 दरम्यान, हटिया येथून दर सोमवारी 16.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी 00.40 वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण 9 फेऱ्या होतील.
थांबे: या गाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला या ठिकाणी थांबे असतील.
संरचना: 1 एसी प्रथम, 2 वातानुकूलित द्वितीय, 7 वातानुकूलित तृतीय, 6 शयनयान, 4 सामान्य द्वितीय, 1 जनरेटर डब्बे आणि 1 सामान्य द्वितीय श्रेणी-सह गार्ड ब्रेक व्हॅन.
लोकमान्य टिळक टर्मिनस- संतरागाछी – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (26 सेवा)
ट्रेन क्रमांक 01001 साप्ताहिक विशेष गाडी, 21 एप्रिल 2026 ते 14 जुलै 2026 दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दर मंगळवारी 20.15 वाजता सुटेल आणि संतरागाछी येथे तिसऱ्या दिवशी 05.00 वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण 13 फेऱ्या होतील.
ट्रेन क्रमांक 01002 ही ‘साप्ताहिक विशेष’ गाडी 23 एप्रिल 2026 ते 16 जुलै 2026 या कालावधीत, संतरागाछी येथून दर गुरुवारी 15.50 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 23.45 वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण 13 फेऱ्या होतील.
थांबे: या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर येथे थांबे राहतील.
संरचना: 2 वातानुकूलित द्वितीय, 10 वातानुकूलित तृतीय (इकॉनॉमी), 4 शयनयान, 4 सामान्य द्वितीय आणि 2 जनरेटर डब्बे.
विशेष ट्रेन क्रमांक 08610 साठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर खुले आहे.








