होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सिलेंडर काळाबाजार प्रकरणी ९५० गुन्हे दाखल; २२९ व्यक्तींना अटक

On: April 11, 2026 2:36 PM
Follow Us:
---Advertisement---

LPG Shortage Action: सध्या पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती अस्थिर असूनही, सरकारने देशांतर्गत एलपीजी आणि पीएनजी पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे, विशेषतः रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसाठी, पुरेसा पुरवठा केला जात आहे. सरकारने पुरवठा आणि मागणी या दोन्ही बाजूंनी अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत. अंमलबजावणी आणि देखरेख कार्यवाही सुरू असून एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार बाजार करून कुत्रिम टंचाई निर्माण करण्याऱ्या कारवाई सुरू आहे. त्यात २२९ व्यक्तींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. पेट्रोलियम मंत्र्यालायासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती दिली.

दरम्यान अतिरीक्त एलपीजी सिलेंडरची व्यवस्था केल्यानंतर ही गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहे. एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात कारवाई सुरू आहे. ९ एप्रिल रोजी देशभरात ३८०० पेक्षा जास्त छापे टाकण्यात आले, आणि सुमारे ४५० सिलिंडर जप्त करण्यात आले. आजपर्यंत सुमारे १ लाख २० हजार छापे टाकण्यात आले आहेत, ५७,००० हून अधिक सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत, ९५० पेक्षा जास्त एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत आणि २२९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

एलपीजी पुरवठा घरगुती एलपीजी पुरवठ्याची स्थिती: सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. एलपीजी वितरकांकडे साठा संपल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही. व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटप उपाययोजना: एकूण व्यावसायिक एलपीजी वाटप संकटपूर्व पातळीच्या सुमारे 70% पर्यंत वाढवण्यात आले आहे, यात 10% सुधारणा-संबंधित वाटपाचा समावेश आहे.

९ एप्रिल रोजी, देशभरात १ लाख १० हजारा पेक्षा जास्त ५ किलोच्या मुक्त व्यापार सिलिंडरची विक्री झाली, तर फेब्रुवारी-२०२६ महिन्यात सरासरी दररोज ७७००० सिलिंडरची विक्री होत होती, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे शुक्रवारी माध्यमांना देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

इराण होर्मुझ समुद्रधुनीतून रियाल चलनात टोल वसुलणार? होर्मुझ आणि लेबनान हल्ल्यामुळे तिढा कायम..

America- Israel On Iran: होर्मूझ समद्रधुनीवरून अमेरिका- इराण यांच्यात मतभेद; इस्लामाबाद येथे शांतीवार्ता सुरू

America- Israel vs Iran War: लेबनान हल्ल्यावरून इस्रायल- इराणमध्ये तणाव; समझोत्यातून बाहेर पडू, इराणचा इशारा..!

Iran-US Ceasefire: इराण आणि अमेरिका शस्त्रसंधीचा परिणाम! तेल, गॅस, अन्नधान्यापासून ते विमान तिकिटांपर्यंत, काय स्वस्त होणार? जाणून घ्या

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! एलटीटी-हटिया-संतरागाछी दरम्यान धावणार अतिरिक्त विशेष गाड्या

US-Iran War: इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोने पुन्हा वधारले

Leave a Comment