होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

युवक-युवतींनो लक्ष द्या! महिला बालविकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ‘इतक्या’ पदांची भरती..

On: April 12, 2026 7:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: महिला बालविकास विभागातील रिक्त पदाचा प्रश्न आता लवकरच सुटणार असून शासनाने महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे रद्द करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.

दरम्यान महिला बालविकास विभागातील रिक्त पदांमुळे महिला आणि बालविकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यास अडचणी येत होत्या. ग्रामीण भागात तळागाळापर्यंत योजना राबविणे कठीण झाले होते. विविध पदांच्या मंजुरीमुळे लाभार्थी बालविकासाच्या अनेक योजनांपासून वंचित रहाणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment