New Delhi: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम एलपीजी आणि तेल पुरवठ्यावर होत आहे, केंद्राकडून गॅस आणि तेलाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे, तसेच ‘एलपीजी’ची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभर कारवाई सुरू आहे. त्यामध्ये १५ एप्रिल रोजी २५०० हून अधिक छापे टाकण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी कालपर्यंत अचानक तपासणीचे काम आणखी तीव्र केले असून 238 एलपीजी वितरकांना दंड ठोठावला तर 63 एलपीजी वितरकांचे परवाने निलंबित केले आहे, असे पेट्रोलियम मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.
सरकारने घरगुती एलपीजी पुरवठा सुरळीत करण्याला प्राधान्य दिले आहे. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. घरगुती एलपीजीच्या पुरवठ्यास प्राधान्य देण्यात आले आहे. काल एकंदर उद्योगात ऑनलाइन एलपीजी बुकिंगमध्ये सुमारे 98% वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटपासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहे.
व्यवसायिक ‘एलपीजी’बाबत उपाय योजना
• एकंदर व्यावसायिक एलपीजी वाटप संघर्षापूर्वीच्या पातळीच्या अंदाजे ७०% पर्यंत वाढवण्यात आले आहे, त्यामध्ये 10% सुधारणा-संबंधित वाटपाचा समावेश आहे.
• 3 एप्रिल 2026 पासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) 5 किलो एफटीएल सिलिंडरबाबत जनजागृतीसाठी 5600 हून अधिक शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये 69,000 हून अधिक 5 किलो एफटीएल सिलिंडरची विक्री देखील झाली. काल, आयोजित केलेल्या 500 हून अधिक शिबिरांच्या माध्यमातून 8453 सिलेंडर या 5 किलोच्या एफटीएलची विक्री झाली.
• अलीकडेच, 14 एप्रिल 2026 रोजी बीपीसीएलने 5 किलो एफटीएलबाबत जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या शिबिरांपैकी महाराष्ट्रातील खोपट येथील शिबिरात चांगला प्रतिसाद दिसून आला असून तेथील शिबिरात 5किलो एफटीएलच्या जवळपास 400 सिलिंडरची विक्री झाली.
• 23 मार्च 2026 पासून, अंदाजे 15.5 लाख 5 किलो वजनाच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरची विक्री झाली आहे.
• 14 मार्च 2026 पासून आतापर्यंत एकूण 1,42,156 एमटी (म्हणजे 19 किलो वजनाच्या 74.8 लाखांहून अधिक एलपीजी सिलिंडरच्या समतुल्य) व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली आहे. यामध्ये वाहनांसाठीच्या 8400 एमटीहून अधिक एलपीजीचा समावेश आहे.
• एप्रिल-26 मध्ये (15.04.26 पर्यंत) सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांची दरदिवशीची सरासरी ऑटो एलपीजी विक्री जवळपास 286 एमटी एवढी आहे, फेब्रुवारी-26 मध्ये ती सरासरी 177 एमटी/ प्रतिदिन एवढी होती.










