होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Maha TET Exam: शिक्षक पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख?

On: April 18, 2026 1:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीइटी) २०२६ परीक्षेचे रविवार २१ जून २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी २४ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) २६ मार्च २०२६ रोजी आपल्या अधिकृत वेबसाइटवर ‘महा टीईटी’ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) ही राज्यभरातील प्राथमिक इयत्ता १ ते ५ आणि उच्च प्राथमिक इयत्ता ६ ते ८ वीच्या शाळांमधील शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याकरिता घेतली जाते. अधिकृत वेळापत्रकानुसार, ‘महा टीईटी’-२०२६ (MAHA TET 2026) साठी नोंदणी प्रक्रिया २७ मार्च २०२६ रोजी सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख पूर्वी १६ एप्रिल २०२६ होती. आता मात्र राज्य परीक्षा परिषदने मुदतवाढ दिली असून नवीन तारीख जाहीर केली आहे. दि.२४ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तर परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेतली जाईल. ही परीक्षा महाराष्ट्रातील शासकीय शिक्षक पदांसाठी एक अनिवार्य पात्रता आहे आणि यामध्ये उमेदवारांचे बालविकास, अध्यापनशास्त्र आणि विषय तसेच विशिष्ट ज्ञान तपासले जाते. परीक्षेला बसण्यासाठी अर्जदारांनी विहित शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment