होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Heat Wave: …’या’ चार जिल्ह्यांवर सूर्य कोपलाय; जळगावचे तापमान ४४ अंशाच्या उंबरठ्यावर!

On: April 27, 2026 4:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Letest Weather News: विदर्भावर सूर्य आग ओकत असल्याने तापमान कमालीचा उकाडा जाणवत आहे, साकापासूनच वातावरणात उष्णता जाणवत आहे. दुपारी उन्हाचा तडाखा बसत असल्याने रस्त्यावरील वर्दळ थांबलेली असते, तसेही शासनाने उष्माघातापासून वाचण्यासाठी १२ ते ४ बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान विदर्भातील अकोला ४६.९, अमरावती ४६.८ तर वर्धा ४६.४, यवतमाळ ४६.० अंश सेल्सियस इतके तापमान या जिल्ह्यात आहे. अकोला आणि अमरावती सलग तीन दिवसांपासून ४६ अंशावर तापमान गेल्याने सूर्य याठिकाणी कोपलेलाच असल्याचे दिसून येत आहे. काल रविवारी देखील अकोला आणि अमरावतीचे कमाल तापमान हे ४६ अंशावर होते. एप्रिलमध्येच मे महिन्यासारखे कडक ऊन लागत असल्याने नागिरकांच्या जीवाची काहिली झाली आहे.

जळगावचे तापमान ४३.२

दरम्यान सर्वात कमी तापमान हे महाबळेश्वर येथे ३३.७ अंश सेल्सियस इतके किमान तापमान आहे. जळगाव मध्ये ही हवेत उष्णता जाणवत आहे, उष्णतेच्या झळांनी नागरिक बेजार झाले आहे.दुपारी उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे उष्म्यापासून बचाव करण्यासाठी थंड पेयांचा आधार घेत आहेत, लस्सी, ताक आणि उसाचा आणि फळांचा घेऊन उष्णतेपासून स्वतःचा बचाव करत होते.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान असे आहे संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण- मध्य महाराष्ट् आणि मराठवाडा यथे आज हवामान कोरडे आहे पुणे वेध शाळेने आज येलो अलर्ट दिला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३४.४,
सांताक्रूझ ३३.८,
अलिबाग -,
रत्नागिरी ३४.०,
पणजी (गोवा) ३५.३,
डहाणू ३७.४,
पुणे ४१.८,
लोहगाव ४२.७,
अहिल्यानगर -,
जळगाव ४३.२,
कोल्हापूर ३७.६,
महाबळेश्वर ३३.७,
मालेगाव ४३.२,
नाशिक ४१.४,
सांगली ४१.४,
सातारा ४१.४,
सोलापूर ४३.०,
धाराशिव ४१.६,
छत्रपती संभाजीनगर ४३.४,
परभणी ४३.५,
नांदेड -,
बीड ४२.०,
अकोला ४६.९,
अमरावती ४६.८,
बुलढाणा ४३.५,
ब्रह्मपुरी ४४.२,
चंद्रपूर ४५.०,
गोंदिया ४४.४,
नागपूर ४५.४,
वाशीम ४४.६,
वर्धा ४६.४,
यवतमाळ ४६.०.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment