होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

..तरी ही जळगाव तापलेलेच, तुमच्या जिल्ह्याचे तापमान किती ‘ते’ ही जाणून घ्या!

On: May 12, 2026 6:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Letest Weather News: सलग दोन दिवस जळगावचे तापमान हे जवळपास सुमारे ४५ अंश सेल्सियस इतके होते, सोमवारी तापमान हे ४४.५ इतके होते.मंगळवारी (आज) ही किंचित तापमान घसरले असले तरी पारा हा ४४.३ अंश सेल्सियसवर पोहचला होता, सोमवार सारखेच उन्हाचे कडक चटके लागत आहेत. वातावरणात सकाळपासूनच उकाडा जाणवत आहे. दुपारी सूर्य डोक्यावर आला की चटके असह्य होत. हवेतील उष्म्यामुळे जीवाची काहिली होत आहे. दुपारी १२ ते ४ यावेळेत नागरिक फिरतांना फारसे आढळत नाही, उन्हाच्या झळा सायंकाळ पर्यंत हवामानात जाणवतात.

उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांनी थोड्या थोड्या वेळेत भरपूर पाणी प्यावे, थंड लस्सी, लिंबू पाणी किंवा शरबत, उसाचा रस अशा थंड पेयाचा सहारा घेत उन्हापासून बचाव केला. दुपारी गरज असेल तरच फिरा, फिरतांना देखील टोपी अथवा रुमाल तोंडाला गुंडाळावा जे करून उष्णतेचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, वाढत्या उष्म्याने मागील आठवड्यात पाचोरा आणि जामनेर येथे ही उष्माघाताने दोन जण मृत्यू पावल्याचे सूत्रांनी सांगितले. चोपडा येथे ही उष्माघाताने एकाचा जीव गेल्याचे वृत्त आहे. वृत्ताला दुजोरा मिळाला नसला तरी वातावरणात वाढलेला उकाडा जीवाची काहिली करणारा आहे. त्यामुळे शक्य असेल तर उन्हात फिरणे टाळण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमान तर कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान आज अकोला येथे ४५.१ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. तर सर्वात कमी म्हणजे किमान तापमान हे महाबळेश्वर येथे ३३.३ इतके नोंदवले गेला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३५.४,
सांताक्रूझ ३५.८,
अलिबाग ३८.२,
रत्नागिरी ३४.०,
पणजी (गोवा) ३५.७,
डहाणू ३७.९,
पुणे ४१.६,
लोहगाव ४३.८,
अहिल्यानगर -,
जळगाव ४४.३,
कोल्हापूर ३८.९,
महाबळेश्वर ३३.३,
मालेगाव ४३.२,
नालशक ४२.०,
सांगली ३९.३,
सातारा ४१.१,
सोलापूर ४२.३,
धाराशिव ३४.०,
छत्रपती संभाजीनगर ४३.४,
परभणी ४३.२,
नांदेड -,
बीड ४३.५,
अकोला ४५.१,
अमरावती ४४.०,
बुलढाणा ४३.२,
ब्रह्मपुरी ४२.२,
चंद्रपूर ४१.१,
गोंदिया ३९.२,
नागपूर ४२.०,
वाशीम ४२.६,
वर्धा ४३.८,
यवतमाळ ४१.४.

सोर्स- पुणे वेधशाळा

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment