Delhi News: दिल्लीत २०१२ ला म्हणजेच १४ वर्षांपूर्वी निर्भयाकांड घडले होते, अंगावर शहारा आणणारा या प्रकाराची पुन्हा पुनर्रावृत्ती घडली आहे. पुंन्हा अशा या प्रकरणाने दिल्ली हादरली असून दिल्लीच्या राणी बाग परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. धावत्या स्लीपर बसमध्ये एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला वेगा दिला असून या प्रकाराशी संबंधित बस पोलिसांनी जप्त केली आहे.

पीडितेने पोलिसांना पोलिसांना सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा कामावरून घरी जात होती. तिने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तरुणाला वेळ विचारण्यासाठी ती थांबली, परंतु त्याने महिलेला बळजबरी करून बसमध्ये ओढले, बसमध्ये काही जण आधीच बसले होते. त्यानंतर बस सुरू करून धावू लागली त्याच दरम्यान चालत्या बसमध्ये नराधमांनी तिच्यावर जवळपास दोन तास पाशवी अत्याचार केला. त्यानंतर ७ किलोमीटर नंतर तिला रस्त्यावर फेकले. पोलिसांनी ज्या बसध्ये घटना घडली तिचा तपास लावून बस तात्काळ जप्त केली, तसेच पुरावे जमा केले. घटनेच्या वेळी बस कोणत्या ठिकाणी फिरली याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच आजूबाजूचे सीसीटीव्हीची देखील तपासणी करत आहे.
दरम्यान संबधीत आरोपीला ओळखण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रण तपासले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या शोधासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली असून लवकरच या नराधमांना अटक केली जाईल. दरम्यान पीडितेने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला, ती पीतमपुरा येथील झोपडपट्टी भागात राहते, तसेच मंगोलपुरी येथील एका कारखान्यात काम करते. तिने पोलिसांना माहिती दिली की, तिचा पती आजारी असून घराची सर्व जबाबदारी तिच्या एकटीवर आहे. आणि तिला तीन लहान मुली असून या कारणामुळे तिने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. परिस्थिती बेताची असल्याने तिला काम करावे लागेल अन्यथा घर खर्च चालवणे अवघड होईल, असे तपासात सांगितले.






