bhusaval News: आयआरसीटीसीने (IRCTC) धार्मिक-अध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव पर्यटक ट्रेन अंतर्गत पुरी-कामाख्या -बैद्यनाथ धाम यात्रा आयोजित केली आहे. ही एक पवित्र आणि अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव प्रदान करणारी यात्रा ठरेल, असा विश्वास आयआरसीटीसीने व्यक्त कला आहे. ही तीर्थयात्रा ११ रात्र आणि १२ दिवस चालणार असून २५ जून २०२६ पासून पुणे येथून यात्रेला प्रारंभ होणार आहे. नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव भुसावळ, येथे ही गाडीला थांबा मिळाला आहे, त्यामुळे खान्देश वासियांसाठी धार्मिक पर्यटनाची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.(IRCTC)
ट्रेनचा मार्ग पुढील प्रमाणे आहे
पुणे येथून २५ जूनला यात्रा सुरू होईल, पुणे, लोनावला, कर्जत, पनवेल, कल्याण, नासिक, मनमाड, चालीसगाव जं., भुसावल, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपुर सहित विविध स्थानकावर यात्रेकरूंना चढता आणि उतरता येणार आहे. या यात्रे अंतर्गत प्रमुख धार्मिक अस्थळे अशी अशी असतील, जगन्नाथ मंदिर (पुरी), कामाख्या मंदिर (गुवाहाटी), बैद्यनाथ धाम (जसीडीह), काशीनाथ मंदिर (वाराणसी) तर राम जन्मभूमि मंदिर (अयोध्या) आदींचे दर्शन घडवेल. यासाठी या सर्व-सुविधायुक्त पॅकेजची सुरुवात मात्र २२,७७०/- प्रति व्यक्ती असणार आहे. आयआरसीटीसी पश्चिम क्षेत्र, ग्रुप व्यवस्थापक गौरव झा म्हणाले कि, यात स्पेशल एसी/नॉन एसी प्रवासी क्षमता असून प्रशिक्षणार्थीमुळे भारतात ही यात्रा अविस्मरणीय ठरणार आहे.(IRCTC)
या आपल्या सुविधानुसार इकॉनॉमी स्लीपर (SL), 3AC आणि कम्फर्ट 2AC सेवेचा लाभ निवडू शकता. जवळपास ७५० क्षमता असलेली ही ट्रेन पुणे येथून नागपुर पर्यंत विविध प्रमुख स्थानकावर चढणे आणि उतरण्याची ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या पॅकेजचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे, 2AC, 3AC आणि नॉन-एसी स्लीपरमध्ये गाडीचा प्रवास असेल, राहण्याची व्यवस्था डबल-क्वाड-शेअरिंग राहणार आहे. यात्रे दरम्यान शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल, तसेच एसी, नॉन-एसी दर्शनीय स्थळाचे भ्रमण करता येईल. सर्व यात्रा विमा सुविधा युक्त असेल, असे आयआरसीटीसीने कळविले आहे. पश्चिम क्षेत्राचे डॉ. ए.के. सिंह, यांनी प्रवर्तक व्यवस्था ही सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देणारी राहणार आहे, त्यासाठी सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे, असे स्पष्ट केले आहे.(IRCTC)
यात्रेचे स्वरूप आणि शुल्क असे असेल
या यात्रेत इकॉनॉमी क्लास (स्लीपर): ₹२२,७७०/-
संपूर्ण क्लास (3AC): ₹३९,६२०/-
कम्फर्ट क्लास (2AC): ₹५२,८६०/-
आयआरसीटीसी पर्यटन पोर्टलवर यंत्राचे बुकिंग सुरू झाले आहे. आध्यात्मिक ऊर्जा, प्राचीन परंपरा आणि आरामदायक यात्रा याचा अद्भुत संगम या यात्रेच्या माध्यमातून अविस्मरणीय ठरणार आहे. लवकरात लवकर आपली यात्रा निश्चित करा असे आवाहन आयआरटीसीने केले आहे.(IRCTC)











