होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मे महिन्यात २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री: मंत्री भुजबळ

On: May 22, 2026 5:39 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मे महिन्यात नेहमीपेक्षा २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली.

माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली.

२० ‘मे’ला महाराष्ट्रात ४० टक्के डिझेल मागणी

महाराष्ट्र राज्यस्तरीय समन्वयक (तेल उद्योग) मिहीर गणेश जोशी यांच्या मते, गेल्या काही दिवसांमध्ये विविध जिल्ह्यांमधील हंगामी शेती विषयक कामांमुळे पेट्रोलियम उत्पादनांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. इतर पुरवठादारांच्या तुलनेत कमी किमतींमुळे किरकोळ ग्राहक सार्वजनिक क्षेत्रातील किरकोळ विक्री केंद्रांकडे वळल्यामुळे तसेच संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकही किरकोळ इंधन विक्री केंद्रांकडे वळवल्याने अतिरिक्त मागणीचा दबाव निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही तेल कंपन्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांवर डिझेल आणि पेट्रोलच्या मागणीत मोठी वाढ दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलची ही वाढलेली मागणी तिन्ही तेल कंपन्यांनी पूर्ण केली आहे.

मे 2026 च्या पहिल्या पंधरवड्यात डिझेल विक्रीत 19.66% आणि पेट्रोल विक्रीत 20.39% वाढ नोंदवली गेली. मे 2026 च्या पहिल्या पंधरवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 267 टीकेएल पेट्रोल आणि 502 टीकेएल डिझेलचा पुरवठा करण्यात आला. मे 2026 च्या तिसऱ्या आठवड्यातही वाढीचा हा चढता कल कायम राहिला असून, 18, 19 आणि 20 मे रोजी पेट्रोल विक्रीत अनुक्रमे 34%, 21% आणि 18% वाढ नोंदली गेली, तर याच कालावधीत डिझेल विक्रीत 49%, 42% आणि 40% वाढ नोंदली गेली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment