होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

उकाड्याने हैराण जळगावकरांना दिलासा, तापमान किती घसरले ‘ते’ जाणून घ्या!

On: May 23, 2026 7:52 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: गेल्या दोन दिवसांपासून जळगावचा पारा घसरला आहे, मागील आठवड्यात ४४ अंशावर गेलेला पारा आता हळूहळू उतरला आहे. शुक्रवारी तापमान ४२ अंश नोंदवले गेले होते. आज तापमान आणखी खाली आले आहे. जळगावचे आजचे तापमान ४१.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. असे असले तरी नागरिकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहे. तापमान कमी आहे, मात्र, वातावरणात उकाडा जाणवत आहे. नागरिक असह्य उकाड्याने हैराण झाले आहे. अधूनमधून ढगाळ हवामान होते, मात्र त्याचा फारसा फरक पडत नाही. सायंकाळी उशीरापर्यंत वातावरणात उष्मा असल्याने जीवाची काहिली होते.

विदर्भात तापमानाने कहर केला आहे, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४७.२ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले. त्याखालोखाल वर्धा यथे ४७ अंश सेल्सियस इतके तापमान आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. तर मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्ल्सअस) खालीलप्रमाणे:

मुंबई (कुलाबा) ३५.०,
सांताक्रूझ ३४.५,
अलिबाग ३८.७,
रत्नागिरी ३५.३,
डहाणू ३६.३,
पुणे ३७.०,
लोहगाव ३९.२,
जळगाव ४१.९,
कोल्हापूर ३३.५,
महाबळेश्वर २७.३,
मालेगाव ४१.२,
नाशिक ३६.३,
सांगली ३४.४,
सातारा ३५.७ ,
सोलापूर ३६.८,
धाराशिव ३८.६,
छत्रपती संभाजीनगर ४१.४,
परभणी ४१.३,
बीड ४०.५,
अकोला ४४.८,
अमरावती ४६.४,
बुलढाणा ४१.०,
ब्रह्मपुरी ४७.२,
चंद्रपूर ४६.४,
गोंदिया ४४.९,
नागपूर ४५.७,
वाशीम ४२.६,
वर्धा ४७.०,
यवतमाळ ४५.४.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment