US And Iran clash: इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी क्षेपणास्त्रांचा” (aerospace missiles) वापर करून या “प्रदेशातील शत्रूच्या तळांवर” हल्ला केला. हे निवेदन निम-सरकारी ‘तस्निम’ वृत्तसंस्थेने दिले आहे. अमेरिकेच्या लष्कराने सांगितले की, इराणने आखाती शेजारी देश असलेल्या कुवेत आणि बहरीनच्या दिशेने सात क्षेपणास्त्रे डागली आहे, परंतु त्यापैकी कोणतेही क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकले नाही. (US And Iran clash)
दरम्यान अमेरिकेने सांगितले होते की, त्यांच्या लष्कराने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’च्या दिशेने पाठवलेले इराणचे चार ड्रोन पाडले असून इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील केशम बेट व गोरुक येथील “इराणी किनारपट्टीवरील पाळत ठेवणाऱ्या रडार यंत्रणांवर” हल्ले केले. इराणच्या नौदलाने शुक्रवारी ‘गल्फ ऑफ ओमान’मध्ये अमेरिकन सैन्यावर “इशारा देणारा गोळीबार” केल्याचे वृत्त दिले होते; अमेरिकन जहाजे या भागातील इतर जहाजांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, अमेरिकेच्या लष्कराच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) हे वृत्त फेटाळून लावले आहे, असे वृत्त अल जंजिराने दिले आहे. (US And Iran clash)

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शुक्रवारी दक्षिण लेबनॉनमधील झेबदिन येथे झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये पाच जण ठार झाले, ज्यात एका वैद्यकीय मदतनीसाचा समावेश होता. लेबनीज अधिकाऱ्यांशी नवीन युद्धविराम करार होऊनही, इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांमुळे देशभरात किमान डझनभर लोक मारले गेले.(US And Iran clash)
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २ मार्चपासून देशावर झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये मृतांची संख्या ३,५५८ वर पोहोचली आहे, तर १०,८७० लोक जखमी झाले आहेत. व्याप्त वेस्ट बँक भागात एका कारवर गोळीबार करून इस्रायली सैन्याने सात महिन्यांच्या पॅलेस्टिनी बाळाची हत्या केली आणि त्याच्या पालकांना जखमी केले. हमासने इस्रायलच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.(US And Iran clash)









