होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

छत्रपती चषक अंतिम सामना: अटीतटीच्या लढतीत धानोरा संघाने पटकावला ‘छत्रपती चषक’; चोपडा छत्रपती शिवाजी महाराज संघ ठरला उपविजेता

On: June 12, 2026 5:06 PM
Follow Us:
---Advertisement---

Chopda News: छत्रपती शिवाजी महाराज मॉर्निग क्रिकेट परिवाराच्या वतीने छत्रपती चषक २०२६ चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते, या क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढत टीम धानोरा ११ विरुद्ध चोपडा छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब यांच्यात खेळविण्यात आला. त्यात टीम धानोरा ११ संघाने जिद्द आणि सांघिक प्रयत्नांच्या जोरावर उत्कृष्ट करत चोपडा छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लबचा पराभव करून चषकावर आपले नाव कोरले आहे.

चोपडा छत्रपती शिवाजी महाराज संघाने देखील तगडे आव्हान दिले होते, मात्र अखेर धानोरा संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सामना आपल्या बाजूने वळून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि छत्रपती चषक २०२६ आणि रोख १५ हजाराचे पारितोषिक मिळविले आणि उपविजेता संघाला ७ हजार रुपयांचे पारितोषिकावर समाधान ,मानावे लागले. या विजयानंतर अनेक मान्यवरांनी विजयी टीम धानोरा ११ संघाचे अभिनंदन केले.

छत्रपती शिवाजी महाराज मॉर्निग क्रिकेट परिवाराच्या वतीने गेल्या ४ वर्षापासून छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही ही स्पर्धा पार पडली. यात भव्य एकगांव एक संघ आणि चोपडा शहरातील काही नामांकित संघ क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. चोपडा येथील श्री स्वामी समर्थ केंद्र गोरगावले रोड या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते, त्यात ८ संघ ग्रामीण एक गावं एक संघ आणि चोपडा शहराच्या ८ संघांचा सहभाग होता.

स्पर्धेत प्रथम पारितोषिक जानकीराम पंडित कोळी (कोळंबा) यांच्यातर्फे १५०००/, तर द्वितीय पारितोषिक दादासो. रमाकांत ठाकूर नगरसेवक, गटनेता व नगरपरिषद चोपडा यांच्याकडून ७०००/- रुपयांचे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले होते. स्पर्धेत ६ ओव्हरचे सामने खेळविण्यात आले हॊते. मात्र अंतिम सामना हा ८ षटकांचा खेळविण्यात आला होता. नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत सर्वानी खेळाडू वृत्ती, शिस्त आणि संघ भावनेने या स्पर्धेला प्रतिसाद दिला, त्यामुळे संयोजकांनी सर्व खेळाडू, आयोजक, पंच, प्रायोजक व क्रिकेटप्रेमींचे स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment