होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भुसावळमध्ये दामिनी पथकाची धडक मोहीम; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष जनजागृती

On: June 15, 2026 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---

bhusawal News: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘विद्यार्थी सुरक्षा उपक्रमा’ अंतर्गत नुकतीच भुसावळ शहरात दामिनी पथकाने (Damini Team) विशेष मोहीम राबविली पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थी- विद्यार्थीनींशी संवाद साधून टवाळखोरांना चाप लावण्यासाठी गस्त घातली.

शाळा व महाविद्यालये सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दामिनी पथकाने शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच बसस्थानक परिसराला भेटी दिल्या. यावेळी पथकाने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या आणि सुरक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.

मोहिमेमागील उद्देश

बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक (WPSI) काळे व त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. शाळा व महाविद्यालय परिसरातील टवाळखोरांवर वचक बसावा यासाठी विशेष गस्त घालण्यात आली. आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी उपलब्ध असलेल्या पोलीस हेल्पलाईन व तक्रार निवारण यंत्रणेबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचे आवाहन करत आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, अशा मोहिमा पुढे ही सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment