होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकला उद्या कसे असेल हवामान जाणून घ्या

On: June 30, 2026 7:18 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात बुधवारी १ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, ताशी ४०-५० कि मी वेगाने सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. बुधवारी ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट, सातारा घाट परिसर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली या अकरा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर २० जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. येथे विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी) यांसह वादळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक आणि घाट परिसराला ग्रीन अलर्ट असून याठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हातील धरणगाव आणि अमळनेर याठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान गुरुवारी २ जुलै रोजी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे.

१ ते ४ जुलै दरम्यान येलो अलर्ट

कोकण, मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात १ ते ४ जुलै दरम्यान हवामान विभागाने येळी अलर्ट जारी केलं आहे. दरम्यान दि.२ जुलै रोजी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच ३ जुलैला कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी; तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. ४ जुलै रोजी कोकण-गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी; तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाचा इशारा

*०१ जुलै: कोकण-गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता. कोकण-गोवा किनारपट्टीवर आणि लगतच्या समुद्रात ४०-५० किमी प्रति तास (झोतासह ६० किमी प्रति तास) वेगाने वारे वाहण्याची शक्यता.

*०२ जुलै: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, तसेच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता. कोकण-गोवा किनारपट्टीवर आणि लगतच्या समुद्रात ४०-५० किमी प्रति तास (झोतासह ६० किमी प्रति तास) वेगाने वारे वाहण्याची शक्यता.

*०३ जुलै: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, तसेच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता. कोकण, गोवा आणि लगतच्या पूर्व-मध्य व ईशान्य अरबी समुद्राच्या पट्ट्यात ताशी ४०-५० किमी (झोतांसह ६० किमी) वेगाने वारे वाहण्याची आणि वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे.

*०४ जुलै: कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर ताशी ४०-५० किमी (झोतांसह ६० किमी) वेगाने वारे वाहण्याची आणि वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment