होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

CJP Jantar Mantar Protest: गुंड पाठवून आंदोलन उधळण्याचा डाव: उद्धव ठाकरे

On: July 13, 2026 4:04 PM
Follow Us:
---Advertisement---

Uddhav Thackeray Statement: सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला हळूहळू पाठिंबा वाढत आहे. जंतर मंतरवरील उपोषणाला १६ दिवस झाले असून, आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती खूप खालावली आहे. २० तारखेच्या आंदोलनाआधी जंतर मंतरवर काही गुंड पाठवून हिंसाचार करायचा आणि आंदोलन उधाळण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केला. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला समर्थन जाहीर करत दि. २० रोजीच्या दिल्लीतील आंदोलनाला देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन ही त्यांनी केले.

सरकारला काही देणेघेणे नाही

यापूर्वी अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा सुषमा स्वराज यांनी भाषण केले होते. तेव्हा चर्चेला विलासराव देशमुख गेले होते. एखाद्या व्यक्तीकडून काम होत नसेल, तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा घेऊन त्याठिकाणी सक्षम व्यक्तीची नियुक्ती केली तर गैर काय आहे. असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. मी काही दिवसांपूर्वी सोनम वांगचूक यांना फोन करुन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. तुम्ही प्राणांतिक उपोषण करु नका, या सरकारला काही देणेघेणे नसल्याचे सांगितले.पण, ते म्हणाले की, “मेरा कुछ भी होने दो, देश का भला होना चाहिए.” अशा व्यक्तीसमोर काय बोलायचे. हे सरकार असंवेदनशील आहे. अशी टीका त्यांनी केली.

२० तारखेच्या आंदोलनाला खासदारांनी यावे

याविरोधात २० जूनला दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाला देशातील सर्व खासदारांनी उपस्थित राहावे. तसेच माणुसकी शिल्लक असेल तर, भाजपमधील खासदारांनीही आंदोलनाला आले पाहिजे,. हा देशातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.

आंदोलन उधळण्याचा कट

अभिजीत दिपके देशातील युवकांचा आवाज उठवत आहे. हे युवक सुशिक्षित आहेत. २० तारखेला मोर्चा आहे, त्याच्याआधी काही गुंड सोडून हिंसाचार माजवून आंदोलन उधाळण्याचा डाव आहे. केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे. देशातील युवकांनी नाहीतर पालकांनीही जागे झाले पाहिजे. हा विषय राजकारणाचा नाही, देशाचा आहे. असे ते म्हणाले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सीजेपी आंदोलनाने सरकार नरमले, मंत्री जे पी नड्डा नेतृत्वाशी चर्चा करणार; ‘या’ आहेत सीजेपीच्या मागणी

सीजेपीचा दावा, अभिजित दीपके पोलिसांच्या ताब्यात;..तर पोलीस म्हणाले, दिपके ताब्यात नाही! दीपकेंनी उपोषण सोडले

आंदोलक संसद भवनावर धडकले: वांगचुक म्हणाले, मला संसदेतील मोर्चात सहभागी व्हायचंय; सौरभ दास आणि आशुतोष यांची जेपी नड्डा यांच्याशी भेट

दिल्लीला छावणीचे स्वरूप: जंतरमंतरवर आदोलकांची गर्दी; पोलिसांनी लाठीचार्ज करून पांगवले

सोनम वांगचुक यांचा हस्त लिखित संदेश, काय म्हणाले वांगचुक आणि त्यांची प्रकृती कशी ‘ते’ जाणून घ्या

America- Iran conflict: सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिका चवताळला; इराणच्या केशम बेटावर बॉम्बहल्ला

Leave a Comment