होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

“क्षमा करण्याचा मोठेपणा”…असे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट रिशेअर केली; ‘ते’ काय म्हणाले जाणून घ्या

On: August 1, 2026 2:37 PM
Follow Us:
---Advertisement---

 

PM Modi Social Media Post: कॉकरोच जनता पार्टीचे जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. फक्त त्यांच्याबद्दलच असभ्य भाषेचा वापर झाला नाही तर, थेट त्यांच्या आईबद्दलही बोलण्यात आले. त्याचे काही व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ते कॅप्शनमध्ये म्हणाले, शिवीगाळ केल्याने कोणतीही समस्या सुटत नाही. आणि चुकीच्या मार्गावर असलेल्यांना योग्य दिशा दाखवूया, असे बोलून आपण मिळून काम करूया.. असे आवाहन त्यांनी करत ही पोस्ट केली. व्हिडीओमध्ये काही गोष्टींवर स्पष्ट बोलताना म्हणाले, मला शिवीगाळ करण्यात आली, माझ्या दिवंगत आईबद्दलही अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. त्या सगळ्याचं स्वरूप अत्यंत दुर्दैवी होतं, असे म्हणून त्यांनी मी विद्यार्थ्यांना माफ करत आहे, असे जाहीर केले.

दरम्यान पंतप्रधान यांनी रात्री उशीरा हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हा व्हिडीओ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिशेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत एकनाथ शिंदे यांनी सोशल माध्यमात म्हटले की, आई-वडिलांसारखी माया.. चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद.. आणि क्षमा करण्याचा मोठेपणा…असे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते.

”आदरणीय पंतप्रधान यांनी आज देशातील युवकांना दिलेला संदेश हा केवळ पंतप्रधानांचा नव्हता..तर आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या एका वडिलांसारखा होता. मतभेद असू शकतात, चुका होऊ शकतात, पण आपल्या मुलांना सोडून देणे हा भारतीय संस्कार नाही. त्यांना समजावून, क्षमा करून, पुन्हा राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासात सहभागी करून घेणे हीच खरी नेतृत्वाची ओळख आहे. संवाद, सहभाग आणि विश्वास याच पायावर सक्षम भारत उभा राहील”..असे त्यांनी एक्स या आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून पोस्ट केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment