होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

काळाचा क्रूर घाला! कामावर निघालेल्या एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू; सुसरी गावावर शोककळा

On: August 1, 2026 4:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News: वरणगाव ते जाडगाव फाटा दरम्यान शुक्रवारी (ता. ३१) सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सुसरी येथील चेतन प्रमोद पाटील (वय २३) या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमी प्रमाणे दिपनगर येथे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चेतनचा प्रवास अखेरचा ठरेल, याची कल्पनाही त्याच्या कुटुंबाला नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन हा दीपनगर येथे कामासाठी दुचाकी वरून जात असताना महामार्गावर जाडगाव फाटयानजीक बजरंग ढाब्या जवळ अज्ञात डंपरने त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चेतनचा जागीच मृत्यू झाला. अपघाता नंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेची माहिती गावात कळताच सुसरी गावावर शोककळा पसरली. नातेवाईकांचा आक्रोश आणि मित्रांच्या डोळ्यातील अश्रूंनी उपस्थितांचे मन हेलावून गेले.

दरम्यान चेतन हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. घरातील सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. कष्टाळू, शांत स्वभावाचा आणि कुटुंबासाठी झटणारा हा तरुण क्षणार्धात काळाच्या पडद्याआड गेल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्याच्या खांद्यावर घराची स्वप्ने होती, त्यालाच खांद्यावर आज अंत्यसंस्काराची नेण्याची वेळ येणे, ही काळजाला चिरणारी ठरली आहे. सुसरी गावातील ग्रामस्थांनी चेतनच्या निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून अपघात घडवून पसार झालेल्या अज्ञात डंपर व त्याच्या चालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment