Jalgaon News: जळगाव शहरातील जोशीपेठ, बागवान गल्लीतील रहिवासी असलेले इरफान इसाक बागवान (वय ४०) हे शुक्रवार दि.31 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी घरच्यांना ‘कोल्ड ड्रिंक पिऊन येतो,’ असे सांगून घर सोडले होते. मात्र त्यानंतर ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नी मोसीनबी बागवान यांनी दिली.

याप्रकरणी 0033/2026 अशी नोंद दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एक वाजता हरवल्याची नोंद शनिपेठ पोलिसात करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे. इरफान बागवान यांचे डीएमएलटी शिक्षण झाले असले तरी, ते शहरात फळविक्रीचा व्यवसाय करीत होते, अशी माहिती त्यांचे बंधू नवाझ बागवान यांनी प्रसारमाध्यमांना दिली. इरफान बागवान यांच्याबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाणे किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.








