होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

लेखक प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाला कॉपीराइट प्राप्त; सर्जनशील लेखणीच्या सामर्थ्याला मान्यता

On: August 9, 2026 12:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: कवी, लेखक, पत्रकार आणि गीतकार प्रकाश रामदास तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ (Eternal Thoughts) या ग्रंथाला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा कार्यालय, नवी दिल्ली यांच्याकडून अधिकृत कॉपीराइट नोंदणी प्राप्त झाली आहे. कॉपीराइट रजिस्ट्रार यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र तेली यांना प्राप्त झाले असून, त्यांच्या साहित्यिक आणि सर्जनशील कार्याला यामुळे अधिकृत मान्यता मिळाली आहे.

‘शाश्वत विचार’ हा ग्रंथ मानवी जीवन, विचार, संघर्ष, प्रेरणा, नाती आणि समाजजीवनाच्या विविध पैलूंवर भाष्य करणाऱ्या चिरंतन विचारांना केंद्रस्थानी ठेवून साकारण्यात आला आहे. या ग्रंथाला कॉपीराइट प्राप्त होणे हा आपल्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रकाश तेली यांनी सांगितले.

लेखणी आणि विचारांना मान्यता

“ही केवळ आनंदाची बाब नसून, माझ्या लेखणीला, विचारांना आणि अनेक वर्षांच्या साहित्यिक साधनेला मिळालेली अधिकृत मान्यता आहे. माझ्या सर्जनशील लेखणीच्या सामर्थ्याला मिळालेली ही मान्यता पुढील साहित्यिक कार्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी आहे,” अशी भावना प्रकाश तेली यांनी व्यक्त केली. या निमित्ताने त्यांनी आपल्या वाचकांचे, मित्रांचे, हितचिंतकांचे आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले. “वाचकांचे प्रेम, विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन हीच माझ्या लेखणीची सर्वात मोठी प्रेरणा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

प्रकाश तेली यांच्या प्रकाशित 21 पुस्तकांची नावे

1) बाल-विवाह 2) बढ़ती जनसंख्या 3) सड़क सुरक्षा 4) किसान 5) वोट 6) नदी – भारत की जलधारा 7) वोट-2 8) वोट-3 9) खाद्य सुरक्षा 10) वोट-4 11) 12) पानी 13) बिजली संरक्षण 14) शिक्षा की महत्ता 15) पेड़ की महत्ता 16)झाडे जीवनाचा आधार (मराठी) 17) प्रकृति की महत्ता 18) जीवन काय आहे? – मराठी (What is Life) 19) प्रेरणादायी विचार-मराठी (Inspirational Thoughts) 20) शाश्वत विचार-मराठी (Eternal Thoughts) 21) लोकनेता (मराठी) लवकरच जीवन क्या है ? हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.

सर्जनशील लेखनाला मिळणारा अधिकार

कॉपीराइट हा मूळ साहित्यिक, कलात्मक किंवा सर्जनशील कृतीच्या लेखकाला मिळणारा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे संबंधित कृतीच्या अनधिकृत प्रतिकृतीकरणास, वापरास किंवा व्यावसायिक शोषणास कायदेशीर संरक्षण मिळते. प्रकाश तेली हे कवी, लेखक, पत्रकार आणि गीतकार असून, घोषवाक्य व कविता लेखनातील जागतिक विक्रमवीर म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते (‘MyGov Champion & Change Maker’) आहेत.

‘शाश्वत विचार’ या ग्रंथाला मिळालेल्या कॉपीराइट नोंदणीमुळे प्रकाश तेली यांच्या साहित्यिक कार्याला नवी ओळख मिळाली असून, त्यांच्या सर्जनशील लेखणीच्या प्रवासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment