होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचे २१४ सराईत गुन्हेगारांच्या घरांवर छापे; ७ गावठी कट्टे, ११ जिवंत काडतुसांसह तलवार जप्त!

On: August 14, 2026 2:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच बेकायदेशीर शस्त्रांचा वापर आणि शस्त्रांशी संबंधित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटेपासून जिल्हाभर धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ३/२५’ अंतर्गत तब्बल २१४ सराईत गुन्हेगारांच्या घरांची, वास्तव्याच्या ठिकाणांची तसेच वाहनांची अचानक तपासणी करण्यात आली. या कारवाईत ७ गावठी कट्टे, ११ जिवंत काडतुसे आणि तलवार जप्त करण्यात आली.

गेल्या दहा वर्षांत भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वापराशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांनी संकलित करून त्याचे विश्लेषण केले. त्यानुसार संशयित व सराईत आरोपींची यादी तयार करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सुमारे सहा वाजता जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके एकाच वेळी रवाना करण्यात आली. त्यामुळे संबंधितांना कारवाईची कोणतीही पूर्वकल्पना मिळाली नाही.

पोलिसांनी आरोपींच्या घरांसह त्यांच्या ताब्यातील वाहनांचीही कायदेशीर प्रक्रियेनुसार झडती घेतली. तसेच आरोपींनी शस्त्रे स्वतःकडे न ठेवता मित्र, नातेवाईक अथवा परिचितांकडे लपवून ठेवली आहेत का, याचीही पडताळणी करण्यात आली.

या कारवाईत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी किशोर ऊर्फ गोजऱ्या सकरू जाधव याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड, तर वरणगाव पोलिसांनी रोशन विकास पाटील याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त केला. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी राजकिरण रायपुर मानसिंग परदेशी याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत केला.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने रईस रफिक तांबोळी याच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत राऊंड, तर चाळीसगाव येथील कारवाईत प्रथमेश लक्ष्मण भामरे याच्याकडून दोन गावठी कट्टे व सहा जिवंत राऊंड जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या व्यापक कारवाईमुळे शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment