होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रसाद सोनवणे याची ४० व्या ज्यु. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

On: August 22, 2026 6:43 PM
Follow Us:
---Advertisement---

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रसाद सोनवणे याची ४० व्या ज्यु. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

prasad sonawane selected for the 40th junior state level athletics meet

athlete prasad sonawane, athletic jalgaon, jalgaon sports, sports news, state level sports, vivekanad college jalgaon, mj college jalgaon, jalgaon sports, jalgaon news, ऍथलीट प्रसाद सोनवणे, ऍथलेटिक जळगाव, जळगाव क्रीडा, क्रीडा बातम्या, राज्यस्तरीय क्रीडा, विवेकानद कॉलेज जळगाव, एमजे कॉलेज जळगाव, जळगाव क्रीडा, जळगाव बातम्या,

Jalgaon News: जळगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार प्रसाद सोनवणे याची ‘४० व्या ज्यू.राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा रत्नागिरी येथे दिनांक २७ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान होणार आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

जिद्द आणि मेहनतीने केलेल्या प्रयत्नांना यश हमखास मिळते. हे प्रसाद सोनवणे याने दाखवून दिले. त्याने ११० मी. हॅडल्स या क्रीडा प्रकारात आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर ही निवड मिळवली असून, त्याच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

त्याच्या निवडीननंतर एम.जे. स्वायत्त महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. केतन नारखेडे, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. आर. बी. ठाकरे, समन्वयक प्रा. स्वाती बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन, पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. उमेश पाटील, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.गुणवंत वंजारी, जिमखाना समिती चेअरमन प्रा. वर्षा पाटील आदिंनी प्रसाद सोनावणे याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रसादला क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालय, पालक व जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या चार खेळाडूंची निवड; विवेकानंद महाविद्यालयातील या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव

माहेश्वरी चोपडेची पंजाबमधील बॉक्सिंग चाचणीसाठी निवड

छत्रपती चषक अंतिम सामना: अटीतटीच्या लढतीत धानोरा संघाने पटकावला ‘छत्रपती चषक’; चोपडा छत्रपती शिवाजी महाराज संघ ठरला उपविजेता

इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस कर्णधार; आणखी कोणाची निवड झाली “ते” जाणून घ्या

IPL Mega Clash:’आरसीबी’समोर विजेतेपद कायम ठेवण्याचे आव्हान; गुजरात टायटन आरसीबीला रोखणार का?

सुरगाण्यातील सातबाभळच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘वानखेडे’चा थरार

Leave a Comment