होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

ऐन गणेशोत्सवात नंदगाव-पिलखेडा परिसरात विजेचा लपंडाव! गणेश मंडळं अन् नागरिक त्रस्त

On: September 20, 2026 2:54 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: ऐन गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) काळात तालुक्यातील नंदगाव-पिलखेडा परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रोज रात्री वारंवार वीज जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेचा लपंडाव सुरू असल्याने गणेश मंडळांची गैरसोय होत असून गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम, धार्मिक उपक्रम यांवर याचा परिणाम होत आहे. महावितरणविषयी परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी युवासेनेने केली आहे. (Yuva Sena)

दोन दिवसांपासून विजेचा खोळंबा

गणेशोत्सवाची परिसरात मोठ्या उत्साहात धामधूम सुरु असतानाच ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या कारणामुळे वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे तसेच नंदगाव येथील डीपीमध्ये बिघाड झाल्याने तब्बल दोन दिवस वीजपुरवठा लपंडाव सुरू होता. त्यामुळे ऐन गणपती उत्सवात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तसेच गणेश देखावे बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

मंडळाचे कार्यकर्ते अन् नागरिकांमध्ये रोष

या प्रकरणी गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांनी महावितरणकडे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. “नंदगाव-पिलखेडा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही गंभीर बाब आहे. ऐन गणपती उत्सवात नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ येत आहे. महावितरणने तातडीने डीपी व वीजवाहिन्यांची तपासणी करून बिघाड दूर करावा आणि परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी स्वप्निल सोनवणे यांनी केली.

तातडीने दुरुस्ती करावी

तसेच रात्रीच्या वेळेस वारंवार होणारे वीजखंडित होण्याचे प्रकार थांबवून, गणपती उत्सवाच्या काळात नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळेल याची महावितरणने दक्षता घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. वीजपुरवठ्याच्या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment