होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दुष्काळ निवारण उपसमितीची स्थापना, सर्व मंत्री-आमदार शेतकऱ्यांच्या बांधाना देणार भेटी; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले ‘ते’ जाणून घ्या

On: September 22, 2026 3:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: राज्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. पाण्याअभावी पिके करपली व सुकली आहे. शेतातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे. विरोधक आणि सत्ताधारी काही आमदारांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनाही आक्रमण होत आहे. या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.

पंचनामे करण्याचे आदेश दिले

दरम्यान दुष्काळा संदर्भात घेण्यात आलेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना माहिती देतांना सांगितले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे उद्यापासून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. ते म्हणाले, बहूतांश भागात पीकं करपली आहेत. ⁠सोयाबीन आणि कापूस पिकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे, ⁠भात पिकावर ही परिणाम झाला आहे, त्या पिकांचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. विशेषतः ⁠पिण्याचं पाणी व जनावरांना चार कसा उपलब्ध करून देता येईल, त्यावर लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि पंचायत राज संस्थांकडे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दुष्काळ निवारण उपसमिती स्थापन

राज्यात दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, प्रताप सरनाईक, संजय राठोड, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील हे सदस्य असणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे या उपसमितीचे सदस्य सचिव असणार आहे.

दुष्काळाबाबत अधिक माहिती या समितीकडे दिले जाईल. या उपसमितीला अधिकार दिले आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मी ही उद्या २३ सप्टेंबरपासून दौरा करणार आहे, ⁠सर्व मंत्री आणि आमदार बांधावर जातील. तसेच एनडीआरएफचे काही नियम आहेत, त्यानुसार प्रक्रिया राबविले जाणार आहे⁠. मात्र, आम्ही वाट पाहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment