Todays Gold And Silver Rate: सध्या सणासुदीचा काळ आहे त्यातच लग्नसराईचा ही काळ सुरू होणार असल्याने बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. याच काळात ग्राहकांसाठी खुशखबर आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला सुवर्णसंधी आहे. २४ सप्टेंबरला सोन्या-चांदीच्या किमतीत वायदे बाजारात घसरण झाली असून, एमसीएक्सवर (MCX) सोने प्रति १० ग्रॅमला सुमारे १,५०,७८७ रुपयांच्या आसपास आहे, तर चांदी प्रति किलोग्राम सुमारे २,३३,२०० रुपयांच्या आसपास भाव दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते आंतराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला असून कच्च्या तेलाच्या किंमती ही वाढल्या आहे. त्याचा परिणाम म्हणजे सोने-चांदीच्या दरात घसरण झाली.
सोने दरात आज ०.३४ टक्के घसरण
आज २४ सप्टेंबर रोजी एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १,५०,७८७ रुपयांच्या आसपास आहे. सोन्याच्या दरात ०.३४ टक्के घसरण झाल्याचे दिसत आहे. तर काल म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने ९०० रुपयांनी घसरून १.५४ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर आले होते. महत्त्वाची म्हणजे सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे.

सोन्याचे दर का घसरले
दरम्यान सोन्याच्या दरात बुधवार वगळता गुरुवारी आज आठवड्यातील तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. घसरणीमागे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला आहे. दरम्यान ‘एलकेपी सिक्युरिटीज’च्या मते, सोन्याचे दर उच्च पातळीवर असताना व्यापाऱ्यांनी आपला नफा वसूल करण्यासाठी सोन्याची विक्री केली, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आणि दरात घसरण झाली.
चांदीच्या दरात इतकी घसरण
सणासुदीच्या काळात चांदीचे दर घसरल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे. चांदी दरात १.१४ टक्क्याची घसरण ‘एमसीएक्स’वर नोंदवली गेले आहे. आज वायदे बाजारात चांदी प्रति किलोग्राम सुमारे २,३३,२०० रुपयांच्या आसपास भाव दिसत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला असून क्रूड ऑइल दर वाढला आहे. त्याचा परिणाम सोने चांदीच्या दरावर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर जर तुम्ही खरेदीसाठी जात असाल, तर आधी ताजा दर नक्की काय आहे हे माहिती करून मग खरेदीला प्राधान्य द्यावे.











