होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Hatnur Dam: दिलासा! हतनूर धरणात 100 टक्के भरले, पण.. ‘या’ कारणामुळे विसर्ग बंद

On: September 29, 2026 1:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Hatnur Dam: ‘एल-निनो’च्या प्रभावमुळे यंदा राज्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावर प्रशासनाचा भर आहे. असे असले तरी जळगाव जिल्ह्याला हातनूर धरणाच्या रुपाने दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेल्या हतनूर धरणातील पाणीसाठा मुबलक असून धरण 100 टक्के भरले आहे. असे असले तरी संभव्य पाणीटंचाई लभात घेता खबरदारी म्हणून धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असली तरी झाला त्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी समाधानकारक आहे. सध्या पाऊस नसल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असली तरी धरण पुर्ण भरले आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी सोमवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी धरणाचे सर्व दरवाजे आणि कालव्याद्वारे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तीन वाजता हतनूर धरणाची पाणीपातळी २१३.९३० मीटर इतकी नोंदवण्यात आली. धरणात सध्या २५०.१० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९८.०८ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. तर धरणातील एकूण जलसाठा ३८३.१० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९८.७४ टक्के इतका आहे. सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून तापी नदीपात्रात तसेच कालव्यामधून सोडण्यात येणारा अतिरिक्त विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला.

पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

हतनूर धरणाची निर्धारित पाणीपातळी २१४.०० मीटर आहे. धरण जवळपास पूर्ण भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणात नवीन पाण्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. हतनूर धरण जवळपास १०० टक्के भरल्याने आगामी काळातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात सुरक्षित झाली आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरणातील मुबलक जलसाठ्यामुळे परिसराला मोठा दिलासा मिळाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment