होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

प्रवाशांनो लक्ष द्या: रेल्वेचा कसारा येथे १२ दिवसांचा ट्रॅफिक- पॉवर ब्लॉक; ‘या’ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

On: October 4, 2026 1:10 PM
Follow Us:
---Advertisement---

Central Railway: आसनगाव – कसारा ( Asangaon- Kasara) दरम्यान रेल्वेचा तिसरी लाईन प्रकल्प आणि कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाईन विस्तारीकरण काम ७ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या कामांच्या अनुषंगाने ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’, ‘नॉन-इंटरलॉकिंग’ आणि ‘पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंग’ करण्यात येणार आहे. त्यामुळे कसारा येथे १२ दिवसांचा रेल्वेचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. Central Railway)

कामाचे फायदे

आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम हे कसारा आणि कल्याण दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या प्रकल्पाचाच एक भाग आहे. यामुळे मेल-एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक स्वतंत्र करणे शक्य होईल आणि रेल्वेलाईची क्षमता वाढून अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण होईल. कामकाजात अधिक लवचिकता येऊन गाड्यांच्या हालचालींचे नियमन अधिक सुरळीत होईल. अतिरिक्त गाड्या धावतील. या मोठ्या प्रकल्पाचे पूर्ण लाभ मिळवण्याच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे.

‘या’ रेल्वे गाड्य़ांवर परिणाम

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) बनारस एक्सप्रेस (प्रवास सुरू ८ ऑक्टोबर) ही ९ ऑक्टोबरला ०४.०० एलटीटी येथून सुटेल. एलटीटी-पाटलीपुत्र एक्सप्रेस (प्रवास सुरू ८ ऑक्टोबर) ही ९ ऑक्टोबरला ०४.१५ वाजता एलटीटीहून सुटेल. मुंबई सीएसटी – अमृतसर एक्सप्रेस (प्रवास सुरू ८ ऑक्टोबर) ही गाडी ९ ऑक्टोबरला ०४.०० वाजता सीएसटी येथून सुटेल. सीएसटी – बनारस महानगरी एक्सप्रेस (प्रवास सुरु ९ ऑक्टोबर) ही सीएसटी येथून त्याच दिवशी पहाटे ०४:१५ वाजता सुटेल. एलटीटी-गोरखपुर कुशीनगर एक्सप्रेस (प्रवास सुरु ९ ऑक्टोबर) सीएसटी येथून त्याच दिवशी पहाटे ०४:३० वाजता सुटेल.

इगतपुरीत ‘या’ गाड्यांचे नियमन होईल

गोरखपुर – एलटीटी ७ ऑक्टोबरला १८:१५ ते २०:०० या वेळेत. गोमती नगर – मुंबई सीएसटी पुष्पक एक्सप्रेस ७ आणि ८ ऑक्टोबरला १८:३० ते २०:१० या वेळेत. अयोध्या कँट – एलटीटी ८ ऑक्टोबरला १८:१५ ते २०:०० या वेळेत.

बलिया – दादर एक्सप्रेस ९ ऑक्टोबरला ०१:०० ते ०२:०० या वेळेत. शालीमार – एलटीटी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ९ ऑक्टोबरला ०१:१५ ते ०२:१० या वेळेत.

दादर – गोरखपुर एक्सप्रेसला ८ ऑक्टोबरला खर्डी येथे १ तास तर एलटीटी-राजगीर एक्सप्रेसला ८. ऑक्टोबरला आटगाव येथे ३० मिनिटे थांबवून ठेवले जाईल.

भुसावळ विभागात खालील गाड्यांच्या वेळेत ३० मिनिटे ते १ तास २५ मिनिटांच्या कालावधीसाठी नियमन केले जाईल:

७ ऑक्टोबर हरिद्वार – एलटीटी एक्सप्रेस आणि सीतापुर – एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस. ७ आणि ८ ऑक्टोबर- हावडा – मुंबई सीएसटी गीतांजली एक्सप्रेस आणि नांदेड – सीएसटी तपोवन एक्सप्रेस. ९ ऑक्टोबर-शालीमार – एलटीटी, हावडा – सीएसटी आणि, साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस.

पुढील गाड्यांना विलंब होईल

पुढील गाड्यांना विलंब होईल- ७ ऑक्टोबर- साईनगर शिर्डी – सीएसटी वंदे भारत एक्सप्रेस, बलिया – एलटीटी कामायनी एक्सप्रेस,अमृतसर – सीएसटी एक्सप्रेस, गोरखपुर – एलटीटी कुशीनगर एक्सप्रेस, जयनगर – एलटीटी, पनवेल – गोरखपुर एक्सप्रेस, एलटीटी-सीतापुर एक्सप्रेस, एलटीटी – गोरखपुर एक्सप्रेस, एलटीटी – धनबाद एक्सप्रेस. ८ ऑक्टोबर- एलटीटी – गोरखपुर एक्सप्रेस, एलटीटी – राणी कमलापती एक्सप्रेस, एलटीटी – छपरा अंत्योदय एक्सप्रेस.

७ आणि ८ ऑक्टोबर- सीएसटी- नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, सीएसटी- बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस, सीएसटी – हावडा दुरंतो एक्सप्रेस.

८ ऑक्टोबर- गोरखपुर – एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस, बल्हारशाह -सीएसटी नंदीग्राम एक्सप्रेस, प्रतापगड – एलटीटी उद्योग नगरी एक्सप्रेस, गया – एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस, अमरावती – सीएसटी एक्सप्रेस.

लोकल गाड्यांवरील परिणाम

ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल रेल्वे गाड्यांची सेवा उपलब्ध राहणार नाहीत. तर ७ आणि ८ ऑक्टोबरला इतर उपनगरीय सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन/ ओरीजनेशन केले जाईल. मुंबई सीएसटी येथून १३.१०, १४.१७, १४.४६ आणि १६.५० वाजता सुटणाऱ्या कसारा उपनगरीय रेल्वे गाड्या आसनगाव येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. कसारा येथून १५.३५, १६.१६, १७.०२, १८.१७ वाजता सुटणाऱ्या कसारा – सीएसटी गाड्या अनुक्रमे १६.१२, १६.५४, १७.३९, १८.५४ वाजता आसनगाव येथून सुटतील.

ब्लॉकपूर्वी ‘डाऊन नॉर्थ ईस्ट’ मार्गावर कसारा येथे जाणारी शेवटची उपनगरी ट्रेन सीएसटी टर्मिनस येथून १२.३० वाजता सुटेल. ‘अप नॉर्थ ईस्ट’ मार्गावर सीएसटीस येथे जाणारी शेवटची लोकल कसारा येथून १४.४२ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर ‘डाऊन नॉर्थ ईस्ट’ मार्गावर कसारा येथे जाणारी पहिली लोकल सीएसटी येथून १८.२८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर ‘अप नॉर्थ ईस्ट’ मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली लोकल कसारा येथून २०.३५ वाजता सुटेल.

८ आणि ९ ऑक्टोबरला ब्लॉकपूर्वी खालील उपनगरीय गाड्या रद्द राहतील

‘डाऊन नॉर्थ ईस्ट’ मार्गावर कसारासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल गाडी सीएसटी येथून २१.३२ वाजता सुटेल. ‘अप नॉर्थ ईस्ट’ मार्गावर सीएसटी साठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल गाडी कसारा येथून २२.०० वाजता सुटेल.

‘डाऊन नॉर्थ ईस्ट’ मार्गावर कसारासाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसटी येथून ०४.१९ वाजता सुटेल. ‘अप नॉर्थ ईस्ट’ मार्गावर सीएसटीसाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल कसारा येथून ०४.५९ वाजता सुटेल.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment