Latest Weather News: एल निनोचा परिणाम आता हिवाळ्यात ही जाणवेल, असा अंदाज तज्ज्ञांनी आधीच व्यक्त केला आहे. पितृपक्षात ऑक्टोबरच्या पाहिल्याचा आठोवड्यात उन्हाचे चटके असह्य होत आहे. सकाळपासूनच तापमानाचा पारा वर जात असल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे ऊन ऑक्टोबर महिन्यात सर्वांची परीक्षा बघेल, असे दिसते. आज, मालगावचे तापमान ३८.४ अशांवर नोंदवले गेले आहे. मालेगावमध्ये यंदा पावसाचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे मालगाव दुष्कळाच्या छायेत आहे.
आगामी काळात जसजसा ओक्टोबर पुढे सरेल तसा उन्हाचा तडाखा आणखी वाढेल असे दिसते. जळगाव ही ३७.५ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे हवामानात उष्मा जाणवत आहे. उन्हामुळे घामाच्या धारा देखील वाहत आहे. दिवसभर कडक उन पडत असल्याने काही ठिकाणी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत परिस्थिती बघता पिण्याचे पाणी आणि चारा याचा बंदोबस्त करण्याचे आदेश शासनाने आधीच दिले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ४ व ५ ऑक्टोबरला कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच कोकण सोडले तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे. ४ व ५ ऑक्टोबरला कोकणाला तर ६ ऑक्टोबरला विदर्भाला येलो अलर्ट आहे. परंतु हा भाग सोडला तर, उर्वरित महाराष्ट्रात कोरडे आणि दमट हवामान आहे. पुढील काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील या जिल्हातील कमाल तापमान किती आहे ते जाणून घ्या
जिल्हे कमाल तापमान अंश सेल्सियसमध्ये
मुंबई 36.5
नागपूर 35.2
पुणे 34.8
छ. संभाजीनगर 36.3
नाशिक 34.5
कोल्हापूर 33.2
सोलापूर 36.4
रत्नागिरी 37.7
सातारा 34.7
सांगली 32.7
मालेगाव 38.4
जळगाव 37.5
परभणी 34.7
अकोला 37.1
पणजी 34.5










