होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

MPSC Protest: मुख्यमंत्री सकारात्मक असल्याने लवकरच चांगली बातमी येईल; राज ठाकरे यांची माहिती

On: October 9, 2026 12:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Pune News: एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे. पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलकांना पुणे पोलिसांनी एस.एम जोशी पूल मोकळा करण्यास सांगितले आहे. मात्र, विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत विद्यार्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) गटाचे आ. रोहित पवार (Rohit Pawar) आंदोलनाविषयी ठाम असल्याचे दिसले. मात्र विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackery) यांनी सांगितल्याने लवकरच चांगली बातमी येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी असे सांगितले. तसेच आंदोलनस्थळी आल्यावर मुख्यमंत्र्यांपर्यंत तुमचे प्रश्न मांडेल, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली.

यावेळी राज ठाकरेंनी आपल्या शब्दात विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. दुसरं कोणतंही सरकार आलं तरीही ७० हजार पदांची भरती होणार नाही हे लक्षात ठेवा अशी वस्तुस्थिती राज ठाकरेंनी मांडली होती. विशेष म्हणजे रोहित पवारांसमोर राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं. २०२३ मध्ये मनोज जरांगेंच्या मंचावरही राज ठाकरेंनी अशीच परिस्थितीची जाणीव करून दिली होती. आरक्षणाचा निर्णय हा मंचावर बसून किंवा आंदोलनातून होणार नाही. तर तो न्यायालयातून सुटू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपण मुख्यमत्र्यांशी बोललो आहे, ते सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले

५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.

म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा. असे सोशल फ्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून राज ठाकरे यांनी माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment