Jalgaon News: जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे येथील तापी नदीपात्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पती-पत्नीचे मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने खान्देश भागात मोठी खळबळ उडाली आहे. नदीत आढळलेल्या मृत पतीचे नाव हरी पाटील (वय ३५) आणि पत्नी सपना शाम पाटील (२०) अशी दाम्पत्याची नावं आहेत. दोघांनी ही मे महिन्यात प्रेमविवाह केला होता. तसेच हे दोघेही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील रहिवासी आहेत.
घटना अशी
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेने खान्देशात खळबळ उडाली आहे. अमळनेर येथील पाडळसेचा रहिवाशी आणि हंगामी मुक्काम उत्राण ता. एरंडोल येथे राहणारा श्याम हरी पाटील (वय २८) व त्याची पत्नी सपना वय (२०) हे दि, ८ रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील तापी नदीपात्रात पायाला लोखंडी साखळी व कुलूप लावलेल्या स्थितीमध्ये तरंगताना आढळून आले. प्रत्यक्षदर्शनी या घटनेबाबत नरडाणा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली नदीपात्रातील तरंगणारे दोन्ही पती- पत्नीचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला.

या दरम्यान पोलिसांनी असे दिसले की, श्यामचा डावा पाय आणि सपनाचा उजवा पाय साखळीत एकत्र बांधलेला होता व त्याला मोठे कुलूप लावलेले होते. अशा परिस्थिती दोघे आढळल्याने पोलिसांना ही धक्का बसला. त्यांनतर पोलिसांनी दोघांचे शव ताब्यात घेत ते उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.
हत्या की आत्महत्या?
दरम्यान श्याम आणि त्याचा परिवार हा काही वर्षांपूर्वी पाडळसरे गाव सोडून कामधंद्यासाठी उत्राणला गेला होते. त्याचे आई-वडील पुन्हा आल्या मूळ गावी आल्याचे सांगण्यात येते. येथे श्याम हा येथे शेती काम करत तसेच तो स्वतःचा ट्रॅक्टर देखील चालवून आपला उदर्निवाह करत होता. याचा ठिकाणी सपना तेथे सपना नावाची तरुणी बहिणीकडे राहत होती. हळूहळू सपना व श्याम यांची ओळख झाली, त्याचे प्रेमात रूपांतर झाले आणि मग, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मे महिन्यात प्रेमविवाह केल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ते बाहेरगावी गेले होते. त्यानंतर आज त्यांचे अचानक नदीत अशा प्रकारे मृतदेह तरंगताना दिसून आले. या खळबळजनक घटनेने संपूर्ण खान्देश हळहळला असून ही आत्महत्या की हत्या यांची चौकशी पोलीस करत आहेत.








