Abhijeet Dipke Grandmother Passed Away: कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांच्याशी संबंधीत एक महत्त्वीची बातमी समोर आली आहे. दीपके हे दिल्लीत आंदोलनासाठी आले असता त्यांना विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एकीकडे दीपके आंदोलनात असतानाच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दीपके यांच्या आजीचं हिंगोली येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं आहे.
हिंगोली येथील संतुक पिंपरी येथील मूळगावी अभिजीत दीपके यांच्या वडिलांच्या आईचं निधन झालं आहे. अभिजीत यांची आजी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. आजारपणामुळे आज त्यांचं निधनं झालं. त्यामुळे दीपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपके यांचे वडील भगवान दीपके आणि आई अनिता या छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे. त्यांच्या घराभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र, आजीचं निधन झाल्याने अभिजीत दीपके यांचे आईवडील तातडीने हिंगोलीला रवाना होणार आहे.

शेवटची भेट नाही
अभिजीत दीपके गेल्या आठवड्यात मुंबईत आंदोलन करण्यासाठी अभिजीत मुंबईला आले होते. त्यानंतर ते घरच्यांच्या केवळ फोनवरून संपर्क आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत असताना ते आजीला शेवटचं भेटल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर मात्र, मुंबईत आल्यापासून त्यांचा आजीशी संपर्क नव्हता. मात्र, आता अचानक ही दु:खद बातमी आल्याने अभिजीत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दीपके पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, मतदान यादीतील घोळ प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दीपके यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे अभिजीत दीपके सकाळीच मुंबईतून दिल्लीला रवाना झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना दिल्लीत विमानाताच ताब्यात घेतलं.










