Jalgaon News: शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही धरणगाव तालुक्यातील झुरखेडे येथील रहिवासी असून, एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. या अपघाताने झुरखेडे गावावर शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळजवळील वनोली येथे सध्या देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी आलेल्या एका नातेवाईकाला सोडण्यासाठी पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रवींद्र चौधरी हे तिघे कारने गेले होते. तेथे नातेवाईकाला सोडल्यानंतर ते जळगावकडे आले आणि तेथून आपल्या ‘झुरखेडे’ या गावी परत जाण्यासाठी निघाले होते. त्याच दरम्यान जळगाव शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर हा भीषण झाला.
या अपघातात झुरखेडा (ता. धरणगाव) येथील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये पंकज प्रकाश चौधरी (वय ३०), रवींद्र अरुण चौधरी (वय ३०) आणि हरीश हिम्मत चौधरी (वय ३२, सर्व रा. झुरखेडा, ता. धरणगाव) यांचा समावेश आहे. आतेभावाला जळगाव येथे सोडून गावी परतत असताना हा भीषण झाला. या घटनेमुळे झुरखेडा गावावर शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातांनंतर तिन्ही तरुणांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिघांनाही तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील, भूषण कोते आणि तपोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.









